वर्षभरात एकही राष्ट्रीय युवा पुरस्कार नाही; उद्दिष्टाला हरताळ

By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2020 03:03 AM2020-01-12T03:03:27+5:302020-01-12T06:38:50+5:30

केंद्रीय युवा कार्य व क्रीडा मंत्रालय। युवावर्गाचा सहभाग लाभणार कसा?

There is no National Youth Award in a year; Strike the goal | वर्षभरात एकही राष्ट्रीय युवा पुरस्कार नाही; उद्दिष्टाला हरताळ

वर्षभरात एकही राष्ट्रीय युवा पुरस्कार नाही; उद्दिष्टाला हरताळ

Next

सीमा महांगडे 

मुंबई : युवा आणि किशोरवयीन मुलांच्या विकासासाठी राबविल्या जाणाऱ्या राष्ट्रीय कार्यक्रमांतर्गत दिल्या जाणाºया राष्ट्रीय युवा पुरस्काराची संख्या यंदाच्या वर्षात शून्य असल्याचे केंद्रीय मंत्रालयाच्या युवा कार्य व क्रीडा मंत्रालयाच्या संकेतस्थळावरील माहितीवरून स्पष्ट झाले आहे. या पार्श्वभूमीवर देशाच्याजडणघडणीमध्ये तरुण वर्ग किंवा युवा यांचा सहभाग कसा लाभणार, हा प्रश्न उपस्थित झाला आहे.

देशाच्या जडणघडणीमध्ये युथ पॉवर म्हणजे तरुणाईच्या शक्तीच्या योग्य तो वापर करून घेणे ही यंदाच्या राष्ट्रीय युवा दिनाची संकल्पना आहे. मात्र, देशाच्या तरुणाईसाठी काम करणाºया विभागाकडून किंवा त्या अंतर्गत असणाºया उपक्रमाद्वारे युवावर्गाची उपेक्षा होत असेल, तर या संकल्पनेचे उद्दिष्ट कसे साध्य होणार, हा प्रश्न या निमित्ताने समोर येत आहे.

केंद्रीय मंत्रालयाच्या युवा कार्य आणि क्रीडा मंत्रालयाच्या संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या आकडेवारीनुसार, युवा नेतृत्वासाठी जे
कार्यक्रम आयोजित केले जातात, त्यांची वर्षभरातील संख्या केवळ ३,४४५ इतकी असून, त्यामध्ये २६,२९,८८२ इतके सहभागी विद्यार्थी
झाले. तर सप्टेंबर-आॅक्टोबर २०१९ मध्ये एकही युथ पार्लमेंट कार्यक्रम आयोजित करण्यात आला नव्हता. राष्ट्रीय सेवा योजना (नॅशनल सर्व्हिस स्कीम) म्हणजेच एनएसएसमध्ये देशभरातून केवळ वर्षभरात ३९,२५,५०० विद्यार्थ्यांची नोंदणी झाली. त्यातील ४८ हजार विद्यार्थ्यांनी देशभरात झालेल्या विविध जनजागृतीपर उपक्रमांत सहभाग नोंदविल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. यावरून देशाच्या
जडणघडणीत विद्यार्थ्यांना सामावून घेण्यासाठी राज्यस्तरावर आणि केंद्रीय स्तरावर युवामंत्रालय कमी पडत असल्याचे दिसून येते.

राष्ट्रीय युवा दलामध्ये युवा स्वयंसेवक म्हणून वर्षभरातील ६,५६५ इतक्या विद्यार्थ्यांची नोंदणी झाली असून, त्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. मात्र, देशातील केवळ ६ हजार विद्यार्थी विविध उपक्रमांसाठी स्वयंसेवक म्हणून काम करण्याची इच्छा दाखवित असून, ही खेदजनक बाब या आकडेवारीवरून समोर येते.

Web Title: There is no National Youth Award in a year; Strike the goal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.