शहरं
Join us  
Trending Stories
1
आता उद्धव ठाकरेंनी सांगितले, मविआ राज्यात किती जागा जिंकणार; दोन आकड्यांतून संकेत...
2
हे बळी नव्हे तर खून...! घाटकोपर दुर्घटनेवरून देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
3
आज बरसणार शब्दबाण! महायुती दाखवेल शिवाजी पार्कवर दम; बीकेसीत ‘इंडिया’ करणार शक्तिप्रदर्शन
4
Diabetes पासून हार्ट डिजीज पर्यंतचे उपचार करणं होणार स्वस्त; सरकारनं ४१ औषधांच्या किंमती केल्या कमी
5
आजचे राशीभविष्य १७ मे २०२४; आजचा दिवस अनुकूल, आनंदाचे वातावरण राहिल
6
अखेर भावेश भिंडे जेरबंद, उदयपूरच्या रिसॉर्टमधून घेतले ताब्यात; ६० तासांनंतर बचावकार्य थांबले
7
"बच्चन घराण्याचे संस्कार", हात फ्रॅक्चर असलेल्या आईला सांभाळताना दिसली आराध्या, ऐश्वर्याच्या लेकीचं होतंय कौतुक
8
भावेश भिंडेची १०० कोटींची कमाई? निविदा १० वर्षांसाठी मंजूर, पण दिली ३० वर्षांची परवानगी
9
रेल्वेने मुंबई महापालिकेचे थकविले ५७२ कोटी; २२ वर्षे पाणीपट्टी, मालमत्ता कर भरलाच नाही
10
काँग्रेस आणि आपमध्ये दुरावा वाढला? राहुल गांधीच्या सभेचे केजरीवालांना निमंत्रण नाही
11
ज्यांना ‘नकली भाजप’ मान्य नाही त्यांनी आम्हाला मत द्यावे, हिंमत असेल तर...: उद्धव ठाकरे
12
बजेट धर्मावर आधारित कधीच नसते, जातींचा विचार करुन देश चालत नाही: शरद पवार
13
शरद पवार गटाच्या नेत्यांना जमावबंदीच्या नोटिसा; १५ ते १९ मे कुठेही फिरु नका, पोलिसांचा आदेश
14
...तर ईडी आरोपीला अटक करू शकत नाही; सुप्रीम कोर्टाचा निकाल, जामिनासाठी अर्ज अनावश्यक 
15
आज पंतप्रधान मोदींची शिवाजी पार्कवर सभा; वाहतूक वळविली, पाहा, महत्त्वाचे बदल
16
कोकण रेल्वेच्या मार्गातील अडथळे होणार दूर, तिन्ही मागण्या पूर्ण करु: रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव
17
काँग्रेसच्या धोरणांनी गरिबी वाढली; नितीन गडकरी यांची टीका
18
शक्तिप्रदर्शनाला महिला बचतगट लाभार्थींची ताकद; खासदारांबरोबरच आमदारांचीही कसोटी
19
निवडून आल्यावर काय करणार? नागरी प्रश्नांना वर्षा गायकवाड यांच्या ‘न्यायपत्रा’ने हमी
20
ढिगाऱ्याखाली कोणी उरले नाही, काम थांबले; महापालिका आयुक्तांची माहिती

कुलभूषण जाधवांची प्रकृती आणि ठावठिकाण्याविषयी माहिती नाही - परराष्ट्र मंत्रालय

By admin | Published: April 13, 2017 5:12 PM

कुलभूषण जाधव यांची प्रकृती आणि त्यांना कुठे बंदिस्त करून ठेवण्यात आले आहे, याबाबतची माहिती सध्या भारताकडे नाही

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 13 - कुलभूषण जाधव यांची प्रकृती आणि त्यांना कुठे बंदिस्त करून ठेवण्यात आले आहे, याबाबतची माहिती सध्या भारताकडे नाही. पाकिस्तानकडूनही अशाप्रकारची माहिती  देण्यात आलेली नाही, असे परराष्ट्र मंत्रालयाने आज सांगितले. तसेच वारंवार विनंती करूनही कुलभूषण जाधव यांना भेटण्याची परवानगीसुद्धा पाकिस्तानने दिली नसल्याची माहितीही परराष्ट्र खात्याने दिली.
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते कुलभूषण जाधव यांच्याविषयी माहिती देताना म्हणाले, "जाधव यांना सध्या कुठे ठेवण्यात आले आहे, त्यांची प्रकृती कशी आहे, याबाबत आमच्याकडे काहीच माहिती नाही. त्यांच्याविषयी माहितीचा कोणताही दुवा आमच्याकडे नाही. त्यांच्याविषयी उपलब्ध असणारे परिस्थितीजन्य पुरावे त्यांचे कुठल्यातरी ठिकाणाहून अपहरण झाले असावे याकडे इशारा करत आहेत." 
कुलभूषण जाधव इराणमध्ये छोटासा व्यवसाय करत होते. त्याबाबत इराण सरकारलाही कळवण्यात आले होते. पण त्यांच्याकडे याबाबत काही माही माहिती नव्हती. पाकिस्तान गुप्तहेर असल्याचा दावा करत असलेले जाधव हे भारतीय नौदलातून निवृत्त झालेले नौसैनिक असून, ते सर्वसामान्य भारतीय असल्याची माहिती पाकिस्तानला देण्यात आली असल्याचेही त्यांनी सांगितले. 
कुलभूषण जाधव यांची भेट झाल्याशिवाय त्यांच्या अटकेविषयीची सत्यपरिस्थिती कळणार नाही असेही ते म्हणाले, "कुलभूषण जाधव हे पाकिस्तानच्या तावडीक कसे काय सापडले याची माहिती घ्यावा लागणार आहे. त्यांच्या पाकिस्तानमधील उपस्थितीबाबत आमच्याकडे माहिती नाही त्यासाठी जाधव यांची भेट होणे आवश्यक आहे. आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार आम्ही त्यांना भेटू शकतो," असेही बागवे यांनी पुढे सांगितले.