युरियाची दरवाढ नाही
By Admin | Updated: July 9, 2014 01:19 IST2014-07-09T01:19:29+5:302014-07-09T01:19:29+5:30
देशात युरियाच्या किमतीत वाढ करण्याचा कोणताही प्रस्ताव नसून युरियाचा साठाही पुरेसा असल्याचा निर्वाळा सरकारने सोमवारी येथे दिला.

युरियाची दरवाढ नाही
नवी दिल्ली : देशात युरियाच्या किमतीत वाढ करण्याचा कोणताही प्रस्ताव नसून युरियाचा साठाही पुरेसा असल्याचा निर्वाळा सरकारने सोमवारी येथे दिला.
लोकसभेत रसायन व खतमंत्री अनंत कुमार यांनी बी.व्ही. नाईक आणि ए. संपत यांच्या प्रश्नाला उत्तर देताना उपरोक्त माहिती दिली. ते पुढे म्हणाले, मी हे आश्वासन देतो की, युरियाच्या किमतीत कोणतीही वाढ करण्याचा प्रस्ताव आलेला नाही.
नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकार युरियावर आवश्यक ते अनुदान प्रदान करू शकेल. देशात युरियाचा तुटवडा नाही.
शेतक:यांना पेरणीच्या हंगामात युरियाच्या तुटवडय़ाला सामोरे जावे लागत असल्याबद्दलच्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी या हंगामात तसे होणार नाही, अशी ग्वाही दिली.
केंद्राचे काम राज्यांर्पयत खते पुरविण्याचे असून त्याच्या वितरणाची जबाबदारी राज्यांची असल्याचे स्पष्ट करताना, या हंगामात राज्यांना जेवढा युरिया पाठविला जाणो आवश्यक आहे तेवढा तो पाठविला गेला असल्याची माहिती कुमार यांनी नंतर दिली. (लोकमत न्यूज नेटवर्क)