सईदविरोधात पुरावा नाही - पाक
By Admin | Updated: July 19, 2014 02:56 IST2014-07-19T02:56:30+5:302014-07-19T02:56:30+5:30
२६/११च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यातील सूत्रधार हाफिज सईद आणि वेदप्रताप वैदिक यांच्या भेटीवरून वाद सुरू असताना पाकिस्तानने या भेटीबद्दल कानावर हात ठेवले आहेत

सईदविरोधात पुरावा नाही - पाक
नवी दिल्ली : २६/११च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यातील सूत्रधार हाफिज सईद आणि वेदप्रताप वैदिक यांच्या भेटीवरून वाद सुरू असताना पाकिस्तानने या भेटीबद्दल कानावर हात ठेवले आहेत. तसेच जमाद-उद-दावाच्या प्रमुखाविरुद्ध कोणताही पुरावा नसल्याने त्याच्याविरुद्ध कारवाई केली जाऊ शकत नाही, अशी भूमिका घेतली आहे. किंबहुना सईद यांना तुरुंगात टाकण्यासाठी आवश्यकता असलेला कोणताही पुरावा आमच्याकडे नसताना केवळ कोणालातरी खूश करण्यासाठी आम्ही त्याला तुरुंगात टाकू शकत नाही, असेही पाकिस्तानने स्पष्ट केले आहे.