भारतीय मुस्लिमांच्या देशभक्तीवर संशय नाही
By Admin | Updated: September 20, 2014 02:02 IST2014-09-20T02:02:45+5:302014-09-20T02:02:45+5:30
भारतीय मुस्लिम भारतातच राहतील. ते देशासाठी प्राणही देतील. देशासाठी वाईट करावे असे त्यांना वाटत नाही, असे मोदींनी सीएनएन या वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटले.
भारतीय मुस्लिमांच्या देशभक्तीवर संशय नाही
नवी दिल्ली : भारतीय मुस्लिमांचे जगणो- मरणो देशासाठीच असून ते अल- क ाईदा या अतिरेकी संघटनेच्या तालावर नाचणार नाहीत, अशी ग्वाही देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय मुस्लिमांच्या देशभक्तीबाबत प्रश्न उपस्थित करू नये, असा स्पष्ट संदेश दिला आहे.
अल-काईदा आमच्या देशातील मुस्लिमांवर अन्याय करीत आहे, असे मला वाटते. भारतीय मुस्लिम त्यांच्या तालावर नाचतील असा कुणी विचार करीत असेल तर तो भ्रम ठरेल. भारतीय मुस्लिम भारतातच राहतील. ते देशासाठी प्राणही देतील. देशासाठी वाईट करावे असे त्यांना वाटत नाही, असे मोदींनी सीएनएन या वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटले. दक्षिण आशियात विशेषत: भारतात अल-काईदा स्थापण्यासाठी आवाहन करताना अल-काईदाच्या प्रमुखाने एक व्हिडिओ जारी केला आहे.
काश्मीर आणि गुजरातमधील दडपशाहीतून मुस्लिमांना मुक्त करावे, अशी इच्छाही त्यात व्यक्त केली
आहे.
पंतप्रधानांना त्याबाबत विचारण्यात आले असता त्यांनी या व्हिडिओच्या खरेपणाबद्दल प्रश्न उपस्थित केला. भारतात मुस्लिमांची संख्या 17 कोटी एवढी विशाल आहे. त्यांच्यावर अल-काईदाचा प्रभाव दिसत नाही. दुसरीकडे अफगाणिस्तान आणि पाकिस्तानातील मुस्लिमांवर त्याचा चांगला प्रभाव आहे.
भारतातील मुस्लिमांवर अल- काईदाचा प्रभाव का नाही, असे विचारण्यात आले असता मोदी म्हणाले की, सर्वप्रथम मी मनोवैज्ञानिक आणि धार्मिक विश्लेषण करणारा कुणी तज्ज्ञ नाही हे सांगू इच्छितो. जगात मानवतेचे रक्षण केले जाऊ नये काय? मानवतेवर विश्वास ठेवणा:यांनी एकजूट का होऊ नये. हे मानवतेविरुद्ध संकट आहे.
ते एक देश किंवा वंशापुरते मर्यादित नाही. ही मानवता आणि अमानुषता यांच्यातील लढाई आहे आणखी काही नाही, असे मला वाटते. (लोकमत न्यूज नेटवर्क)
च्अनेक मुस्लिम धर्मगुरू आणि नेत्यांनी मोदींच्या विधानाची प्रशंसा केली आहे. आम्ही मोदींच्या वक्तव्याचे स्वागत करतो. ते अगदी योग्य बोलले. हे विधान योग्यवेळी आले असून देशातील वातावरण खराब करणा:या घटकांचे मनोधैर्य त्यामुळे खचेल, असे दिल्लीच्या फतेहपुरी मशिदीचे शाही इमाम मुफ्ती मुकर्रम अहमद यांनी म्हटले आहे.