शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

जय शाह याच्यावर कोणताही भ्रष्टाचाराचा आरोप नाही, पुत्राच्या बचावासाठी सरसावले अमित शाह

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2017 13:16 IST

भाजपा अध्यक्ष अमित शाह यांनी पहिल्यांदाच जय शाह यांच्या कंपनीतील आर्थिक गैरव्यवहारावर पुढे येऊन स्पष्टीकरण दिलं आहे. जयच्या कंपनीनं सरकारसोबत कोणताही व्यवहार केला नव्हता.

अहमदाबाद- भाजपा अध्यक्ष अमित शाह यांनी पहिल्यांदाच जय शाह यांच्या कंपनीतील आर्थिक गैरव्यवहारावर पुढे येऊन स्पष्टीकरण दिलं आहे. जयच्या कंपनीनं सरकारसोबत कोणताही व्यवहार केला नव्हता. कोणतीही सरकारी जमीन जयनं घेतली नाही. हे कोणत्याही प्रकारे भ्रष्टाचाराचं प्रकरण नाही. काँग्रेसकडे जय शाह यानं आर्थिक गैरव्यवहार केल्याचे पुरावे असल्यास न्यायालयात त्यांनी सादर करावे, असं आवाहनही अमित शाह यांनी काँग्रेसला दिलं आहे.स्वातंत्र्याच्या 70 वर्षांनंतर काँग्रेसवर भ्रष्टाचाराचे अनेक आरोप झाले. परंतु आतापर्यंत त्यांनी एकदाही मानहानीचा खटला दाखल केलेला नाही, याकडेही अमित शाहांनी लक्ष वेधलं. माझ्या मुलानं न्यायालयात जाऊन 100 कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा ठोकला आहे आणि स्वतः या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे. आमच्यावर आरोप लावल्यानंतर आम्ही 100 कोटींचा मानहानीचा खटला भरला. काँग्रेसवर आतापर्यंत एवढे आरोप झाले, त्यांनी किती खटले भरले ?, असा सवालही अमित शाह यांनी उपस्थित केला आहे. त्यांच्याकडे पुरावे असल्यास त्यांनी न्यायालयात सादर करावे, असंही ते म्हणाले आहेत.उलाढाल आणि नफ्यात अंतर अमित शाह यांनी पहिल्यांदाच पूर्ण विस्तारानं या संदर्भात स्पष्टीकरण दिलं आहे. जयच्या कंपनीचा वस्तूंची निर्यात करण्याचा व्यवसाय आहे. या कंपनीची उलाढाल 5 हजार रुपयांनी वाढून 80 कोटी रुपयांपर्यंत गेली आहे. परंतु उलाढाल आणि नफ्यात अंतर असतं, ही लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे. कंपनी वस्तूंची निर्यात व आयात करण्याचं काम करते. त्यामुळेच त्या कंपनीची एवढी मोठी उलाढाल आहे. काँग्रेसच्या अनेक नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. अनेक नेत्यांविरोधात न्यायालयात खटले सुरू आहेत. तरीही काँग्रेस या नेत्यांवर कारवाई करण्याऐवजी भाजपावर चुकीचे आरोप लावते आहे, असं म्हणत अमित शाहांनी काँग्रेसवरही निशाणा साधला आहे. 

टॅग्स :Amit Shahअमित शाहBJPभाजपाIndian National Congressइंडियन नॅशनल काँग्रेस