शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

'पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती राजवटीची गरज भासू शकते'

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2019 18:10 IST

पश्चिम बंगालच्या राज्यपालांनी घेतली पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांची भेट

कोलकाता: पश्चिम बंगालमध्ये होत असलेला हिंसाचार पाहता राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची गरज भासू शकते असं राज्यपाल केसरी नाथ त्रिपाठी यांनी म्हटलं आहे. यामुळे तृणमूल काँग्रेस आणि भाजपामधील संघर्ष आणखी पेटण्याची चिन्हं आहेत. शनिवारी पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार झाला. यावरुन तृणमूल काँग्रेस आणि भाजपानं एकमेकांवर आरोप केले. या पार्श्वभूमीवर राज्यपाल त्रिपाठी यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहांची भेट घेतली. पश्चिम बंगालमधील सद्यस्थितीची माहिती मोदी आणि शहांना दिल्याचं त्रिपाठींनी 'इंडिया टुडे' वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं. राज्यातील परिस्थिती पाहता राष्ट्रपती राजवट लागू करण्याची गरज भासू शकते असंदेखील ते पुढे म्हणाले. शनिवारी पश्चिम बंगालमध्ये झालेल्या हिंसाचारात पाच कार्यकर्ते मृत्यूमुखी पडल्याचा दावा भाजपा नेतृत्त्वाकडून करण्यात आला. तर सहा कार्यकर्ते बेपत्ता झाल्याचा दावा तृणमूल काँग्रेसनं केला. त्यामुळे राज्यातील परिस्थिती चिघळली आहे. लोकसभा निवडणुकीदरम्यान पश्चिम बंगालमध्ये प्रचंड हिंसाचार झाला. निवडणूक निकालानंतरही राज्यातील हिंसाचार थांबलेला नाही. निकालानंतरच्या हिंसाचारात आतापर्यंत 12 जणांचा मृत्यू झाल्याचं त्रिपाठींनी सांगितलं. केंद्रीय गृह मंत्रालयानं दिलेल्या सूचना राज्य सरकारकडून फेटाळण्यात आल्या आहेत. याबद्दलच्या प्रश्नावरदेखील त्रिपाठींनी भाष्य केलं. केंद्र सरकारला सूचना देण्याचा अधिकार आहे आणि त्या सूचना स्वीकाराच्या की नाहीत हे ठरवण्याचा अधिकार राज्य सरकारला आहे. यामध्ये माझी कोणतीही भूमिका नाही, असं राज्यपाल त्रिपाठी यांनी म्हटलं.  

टॅग्स :west bengalपश्चिम बंगालNarendra Modiनरेंद्र मोदीAmit Shahअमित शहा