शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजना ज्यांनी राबविली, ते म्हणाले 'आम्ही कर्जात आहोत'; MSP वेळी हात वर केले, केंद्राला पत्र
2
शनी ग्रहाच्या चंद्राने केमिस्ट्रीला देखील फेल केले; तेल आणि पाणी...
3
"सांगा, ही मतचोरी आहे की व्होट जिहाद?"; भाजपाचा विरोधी पक्षांना खोचक सवाल, दिली आकडेवारी
4
ट्रम्प यांच्या धमक्यांचा परिणाम; रशियाकडून भारताला होणारा तेल पुरवठा झाला कमी, नव्या पुरवठादाराचा शोध घ्यावा लागणार?
5
हर'मन' जीत लिया! Will to Win मुळे जगज्जेतेपदाचं स्वप्न साकार, आता थांबायचं नाय...
6
५० लाखांचं पॅकेज असूनही दुःखी; कितीही कमावले तरी 'ते पुरेसे' का वाटत नाही? चार्टर्ड अकाउंटंटची पोस्ट Viral!
7
Tejashwi Yadav : "प्रत्येक महिलेला ३० हजार, शेतकऱ्यांना बोनस, मोफत वीज..."; तेजस्वी यादव यांच्या मोठ्या घोषणा
8
Tripuri Purnima 2025: त्रिपुरी पौर्णिमा हीच 'मनोरथ पौर्णिमा'; ५ नोव्हेंबरला 'या' वस्तूंचे दान ठरेल वरदान!
9
'तुझ्यासाठी बायकोला संपवलं'; दुसऱ्या लग्नासाठी डॉक्टरने केली पत्नीची हत्या; मेसेजमुळे 'डबल गेम'चा पर्दाफाश
10
...म्हणून त्या डंपरचालकाने ५० जणांना चिरडलं, धक्कादायक कारण समोर आलं
11
ऐतिहासिक अंदाज: निफ्टी ५४,००० अंकांचा टप्पा गाठणार; काय म्हणाले एक्सपर्ट?
12
आई-वडिलांशिवाय लेकाची पहिली फ्लाईट, जिनिलिया देशमुखने शेअर केला व्हिडीओ; म्हणाली...
13
काळाचा घाला! बाराबंकीमध्ये भीषण अपघात; ६ जणांचा मृत्यू, ८ जखमी, कारचा चक्काचूर
14
Reliance Anil Ambani: अनिल अंबानींची ७,५०० कोटींची संपत्ती जप्त; नवी मुंबईतील १३२ एकर जागा, पाली हिलमधील घरासह ४० संपत्त्यांवर टाच
15
पगार नाही तर विमानही नाही! इंजिनिअर्सच्या संपाने पाकिस्तान आंतरराष्ट्रीय एअरलाईन्स ठप्प, प्रवाशांचे हाल
16
Tripuri Purnima 2025: दिवाळीनंतर येणारी त्रिपुरी पौर्णिमा का महत्त्वाची? कशी करावी शिवउपासना?
17
CA Final Result: सीए फायनल परीक्षेत मुकुंद अगिवाल देशात प्रथम; फाऊंडेशन परीक्षेत मुंबईचा नील राजेश शाह तिसरा
18
मलायकासोबत दिसणारा 'तो' कोण? अभिनेत्रीहून १७ वर्ष लहान; प्रचंड श्रीमंत आहे हा 'मिस्ट्री मॅन'!
19
हातावर मेंदी लावून आल्या म्हणून मुलींना चक्क वर्गात बसू देण्यास शाळेचा नकार; मुंबईतील घटना
20
कडक! सलमान खानचं गजब ट्रान्सफॉर्मेशन, ६० वर्षांचा होणार भाईजान; बॉडी दाखवत म्हणाला...

सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2025 20:16 IST

सोनम रघुवंशी आणि राज कुशवाहा यांना २ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे तर इतर आरोपींना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

इंदूरच्या राजा रघुवंशी प्रकरणात पत्नी सोनम आणि राज कुशवाहा यांच्या पोलीस कोठडीत वाढ करण्यात आली आहे. मेघालय न्यायालयाने पाचही आरोपींना न्यायालयात हजर केले होते. न्यायालयाने त्यांच्यासह पाचही आरोपींच्या रिमांडमध्ये वाढ केली आहे. शिलाँग जिल्हा सत्र न्यायालयाने राजा रघुवंशी हत्या प्रकरणात सोनम रघुवंशी आणि राज कुशवाहा यांना २ दिवसांची पोलिस कोठडी आणि इतर ३ आरोपी - आकाश राजपूत, विशाल सिंग चौहान आणि आनंद यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. 

वकील तुषार चंदा यांनी सांगितले की, सोनम रघुवंशी आणि राज कुशवाहा यांना २ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे तर इतर आरोपींना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

बुधवारी मेघालय पोलिसांनी पाचही आरोपींची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर त्यांना न्यायालयात हजर केले. मेघालयात २३ मे रोजी राजा रघुवंशीची निर्घृण हत्या करण्यात आली होती. राजा आणि सोनमचे ११ मे रोजी लग्न झाले. त्यानंतर दोघेही गुवाहाटी आणि नंतर शिलाँगला हनिमूनसाठी गेले. मेघालय पोलिसांच्या तपासात असे दिसून आले आहे की, २३ मे रोजी सोहरा येथील वेसाडोंग फॉल्सजवळ राजाला मारण्यासाठी एक नाही तर दोन दाओ शस्त्रे वापरण्यात आली होती. एक दाओ सापडला आहे तर दुसरा ज्या खड्ड्यात राजाचा मृतदेह टाकण्यात आला होता त्याच खड्ड्यात फेकण्यात आला होता. पोलीस अजूनही दुसऱ्या दाओचा शोध घेत आहेत.

सोनमसमोर राजाची हत्या शिलाँगचे एसपी विवेक श्याम म्हणाले की, राजावर तीन हल्ले करण्यात आले. आकाश राजपूत, विशाल सिंग चौहान आणि आनंद कुर्मी या तिघांनी प्रत्येकी एक हल्ला केला. सोनम रघुवंशीने क्राईम सीन रिक्रिएशन दरम्यान कबूल केले की, ती हत्येच्या वेळी घटनास्थळी उपस्थित होती. तिने मारेकऱ्यांना पार्किंगमध्येच राजाला मारण्याचा संकेत दिला होता. पहिल्या हल्ल्यानंतर जेव्हा राजाला रक्त येऊ लागले तेव्हा सोनम ओरडत मागे सरकली. तिन्ही हल्लेखोरांनी मिळून राजाचा मृतदेह खड्ड्यात फेकून दिला. 

इतकेच नाही तर मेघालय पोलिसांच्या तपासात संजय वर्मा हा राज कुशवाह असल्याचे निष्पन्न झाले आहे. दरम्यान, पोलिसांनी इंदूरमध्ये टॅक्सी ड्रायव्हरची चौकशी केली. सोनमने गाजीपूरमध्ये आत्मसमर्पण केले, तेव्हा मेघालय पोलिसांनी तिला ट्रान्झिट रिमांडवर घेतले. त्यानंतर शिलाँग न्यायालयाने सोनमसह पाचही आरोपींना आठ दिवसांची रिमांड दिली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीDeathमृत्यूhusband and wifeपती- जोडीदार