"वादळांविरुद्ध लढण्यात एक वेगळीच मजा असते...", कोर्टाच्या निर्णयानंतर तेजस्वी यादवांची पहिली प्रतिक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2025 15:14 IST2025-10-13T15:12:55+5:302025-10-13T15:14:44+5:30
ज्येष्ठ नेते लालू प्रसाद यादव यांच्यावर आयआरसीटीसी घोटाळ्या प्रकरणी कोर्टाने आरोप निश्नित केले आहेत. यावर आता तेजस्वी यादव यांनी प्रतिक्रिया दिली.

"वादळांविरुद्ध लढण्यात एक वेगळीच मजा असते...", कोर्टाच्या निर्णयानंतर तेजस्वी यादवांची पहिली प्रतिक्रिया
बिहार निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव, त्यांची पत्नी राबडी देवी आणि पुत्र तेजस्वी यादव यांच्या अडचणी वाढल्या आहेत. दिल्लीतील राउज ॲव्हेन्यू कोर्टाच्या विशेष सीबीआय न्यायालयाने आयआरसीटीसी घोटाळा आणि नोकरीसाठी जमीन घोटाळ्याच्या प्रकरणात तिघांविरुद्ध आरोप निश्चित करण्याचा निर्णय दिला आहे. या प्रकरणी आता तेजस्वी यादव यांनी प्रतिक्रिया दिली.
न्यायालयाच्या निर्णयानंतर राजकारण तापले आहे. तेजस्वी यादव यांच्याव्यतिरिक्त एनडीए नेत्यांच्याही प्रतिक्रिया समोर आल्या आहेत. आयआरसीटीसी हॉटेल भ्रष्टाचार प्रकरणात राऊस अव्हेन्यू न्यायालयाने आरोप निश्चित केल्यानंतर राजद नेते तेजस्वी यादव म्हणाले, "ही एक सामान्य न्यायालयीन प्रक्रिया आहे, आम्ही लढू. आम्ही आधीच म्हणत होतो की निवडणुका असल्याने हे सर्व होईल, पण आम्ही लढू; वादळांशी लढण्याची स्वतःची मजा आहे, असंही तेजस्वी याद म्हणाले.
न्यायालयाने आरोपींच्या कथित भूमिकेच्या आधारे विविध कलमांखाली आरोप निश्चित केले. राबडी देवी आणि तेजस्वी यादव यांच्यावर फसवणूक आणि कट रचल्याबद्दल भारतीय दंड संहितेच्या कलम ४२० आणि १२० ब अंतर्गत आरोप ठेवण्यात आले आहेत. लालू यादव, तेजस्वी यादव आणि इतरांनी दोषी नसल्याचे सांगितले. राबडी देवी म्हणाल्या की हा खटला खोटा आहे.
शेवटपर्यंत भाजप विरोधात लढू
"आम्ही नेहमीच संघर्षाचा मार्ग निवडला आहे. आम्ही चांगले मुसाफिर होऊ आणि यशापर्यंत पोहोचू. बिहारचे लोक हुशार आहेत आणि त्यांना काय घडत आहे हे माहित आहे. बिहारचे लोक, देशातील लोक, सत्य काय आहे हे जाणतात. जोपर्यंत भाजप अस्तित्वात आहे आणि मी जिवंत आहे, तोपर्यंत आम्ही भाजपशी लढत राहू", असंही तेजस्वी यादव म्हणाले.
#WATCH | दिल्ली: RJD नेता तेजस्वी यादव ने IRCTC होटल भ्रष्टाचार मामले में राउज़ एवेन्यू कोर्ट द्वारा आरोप तय किए जाने पर कहा, "ये कोर्ट की सामान्य प्रक्रिया है, हम लड़ेंगे। हम तो पहले से ही कह रहे थे कि अब चुनाव हैं तो ये सब होगा ही, लेकिन हम लड़ेंगे, तूफ़ानों से लड़ने का अपना… pic.twitter.com/KhSt6rUjeL
— ANI_HindiNews (@AHindinews) October 13, 2025