वैद्यकीय महाविद्यालयांमधील रिक्त जागांचा तपशील नाही

By Admin | Updated: March 16, 2016 08:39 IST2016-03-16T08:39:51+5:302016-03-16T08:39:51+5:30

देशभरात संचालित सरकारी आणि खासगी वैद्यकीय महाविद्यालयांमधील शिक्षकांच्या रिक्त जागांचा तपशील केंद्रीय आरोग्य मंत्रालय ठेवत नाही. ही बाब राज्य सरकारच्या कार्यक्षेत्रात येते

There are no vacancies in medical colleges | वैद्यकीय महाविद्यालयांमधील रिक्त जागांचा तपशील नाही

वैद्यकीय महाविद्यालयांमधील रिक्त जागांचा तपशील नाही

नवी दिल्ली : देशभरात संचालित सरकारी आणि खासगी वैद्यकीय महाविद्यालयांमधील शिक्षकांच्या रिक्त जागांचा तपशील केंद्रीय आरोग्य मंत्रालय ठेवत नाही. ही बाब राज्य सरकारच्या कार्यक्षेत्रात येते, असे केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याणमंत्री जे.पी. नड्डा यांनी राज्यसभेत खासदार विजय दर्डा यांच्या अन्य प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.
नव्या एम्समधील रिक्त जागा अशा आहेत...
पाटणा - ८०० ऋषिकेश - २१५ भोपाळ - २५१ भुवनेश्वर - २४५ रायपूर - २४६ जोधपूर - २२१
असे असले तरी आरोग्य मंत्रालयाकडे अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेतील (एम्स) रिक्त जागांची माहिती मात्र आहे. भारतीय वैद्यकीय परिषद (मेडिकल कौन्सिल) कायदा १९५६ अंतर्गत नव्या उपनियमानुसार वैद्यकीय महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांच्या पहिल्या तुकडीला अंतिम वर्षाच्या परीक्षेपर्यंत वार्षिक नूतनीकरणाची परवानगी घ्यावी लागते. त्यासाठी मेडिकल कौन्सिलकडून महाविद्यालयांचे वार्षिक निरीक्षण केले जाते. त्यानंतरच केंद्र सरकारकडे शिफारशी पाठविल्या जातात. 
एखादे महाविद्यालय योग्यप्रकारे संचालन करीत नसेल, निवासी डॉक्टर, आवश्यक उपकरणे आणि अन्य सुविधांची कमतरता, तसेच वैद्यकीय शिक्षणाचे किमान मापदंड पूर्ण केले जात नसतील तर नवीकरणाला मान्यता दिली जात नाही.

Web Title: There are no vacancies in medical colleges

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.