शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
2
अमित शाहांच्या बनावट व्हिडीओप्रकरणी एफआयआर दाखल; तेलंगणा काँग्रेसकडून व्हिडीओ शेअर
3
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
4
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
5
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
6
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
7
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
8
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
9
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
10
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
11
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
12
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
13
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
14
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
15
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
16
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
17
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
18
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
19
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
20
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय

'या' राज्यात शंभरी गाठलेले तब्बल ६ हजार मतदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2019 3:47 AM

मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात सर्वाधिक मतदार

- बलवंत तक्षकचंदीगड : हरयाणातील लोकसभा निवडणुकीत यंदा १00 वर्षे पूर्ण केलेले सुमारे ६ हजार मतदार आपला हक्क बजवाणार आहेत. हरयाणातील १0 जागांसाठी १२ मे रोजी मतदान होणार आहे.राज्याच्या मतदारयादीमध्ये वयाची १00 वर्षे पूर्ण केलेल्या मतदारांची संख्या ५९१0 आहे. यापैकी बहुतेक सर्वांनी यंदाही आपली मतदान करण्याची तयारी व इच्छा असल्याचे बोलून दाखवले आहे. शंभरी ओलांडलेले सर्वाधिक मतदार मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांच्य कर्नाल जिल्ह्यातील आहेत. त्यांची संख्या ५५३ आहे. पंचकुलामध्ये अशा मतदारांची संख्या सर्वात कमी म्हणजे ११0 आहे.याशिवाय हरयाणामध्ये ९0 ते ९९ या वयोगटातील मतदार आहेत ८९ हजार ७११. त्यापैकी सर्वाधिक म्हणजे ७९४६ आहेत भिवानी जिल्ह्यातील.

पंजाबच्या फिरोजपूर जिल्ह्यातील करतार कौर या जगातील सर्वात वयोवृद्ध महिला म्हणून ओळखल्या जातात. त्याही यंदा मतदान करणार आहेत. त्यांना अलीकडेच लुधियानातील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते आणि पेसमेकर बसवण्यात आला. त्यावेळी त्यांचे वय ११८ असल्याची नोंद त्यांच्या कुटुंबीयांनी केली. कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार त्यांच्याकडे करतार कौर यांच्या लहान भावाच्या जन्माचा दाखला आहे. त्यानुसार भावाचे वय ११६ आहे. करतार कौर या त्याच्यापेक्षा दोन वर्षांनी मोठ्या आहेत.
फिरोजपूरचे उपजिल्हाधिकारी चंद्र गैंद यांनी सांगितले की, करतार कौर यांच्या कुटुंबीयांकडून अर्ज आला आहे. त्यानुसार नगर परिषदेचा आरोग्य विभागातर्फे त्यांना जन्माचा दाखला दिला जाईल. नगर परिषदेकडे केवळ १९५0 पासूनचे जन्माचे दाखले उपलब्ध आहेत. फिरोजपूरमध्ये १९ मे रोजी मतदान होईल.या दोघींचे लाडके नेतेचंदीगडमध्ये १0४ वर्षांच्या प्रकाश देवी व १0१ वयाच्या सुमेरा देवी राहतात. प्रकाश देवी या दिवंगत इंदिरा गांधी यांनाच कायम आपल्या नेत्या मानत आल्या. आज इंदिरा गांधी हयात नसल्या तरी त्यांचे काँग्रेसवरील प्रेम पूर्वीइतकेच आहे. याउलट सुमेरा देवी म्हणतात की, पंतप्रधान मोदी गरीब कुटुंबातून आलेले आहेत. त्यांना गरीबांविषयी कळवळा आहे. चंदीगडमध्येही १९ मे रोजी या दोघी मतदान करणार आहेत.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकHaryanaहरयाणा