शहरं
Join us  
Trending Stories
1
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
2
Election Results 2026 LIVE: "बंगालच्या विकासासाठी भाजप आता कोणतीही कसर सोडणार नाही"; ऐतिहासिक विजयानंतर PM मोदींची प्रतिक्रिया
3
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
4
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
5
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
6
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
7
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
8
ममता बॅनर्जींची सत्ता गेली! पराभवानंतर अभिषेक बॅनर्जींची पहिली प्रतिक्रिया; मतमोजणीवर उपस्थित केले गंभीर प्रश्न
9
Video: अंदमानच्या अथांग समुद्रात फडकवला तिरंगा! 'अंडरवॉटर' ध्वजारोहणाचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड
10
पाच राज्यांचे निकाल, काँग्रेसच्या पदरात काय? कोणत्या राज्यात किती जागा मिळाल्या?
11
“केरळच्या सुज्ञ जनतेची काँग्रेसचा विचार, राहुल गांधींच्या नेतृत्वाला साथ”: हर्षवर्धन सपकाळ
12
कैलास मानसरोवर यात्रेत नेपाळचा 'खो'! बालेन शाह सरकारने भारत अन् चीनला धाडलं पत्र; नेमकं प्रकरण काय?
13
दीदींना हरवणं सोपं नव्हतं, पण…; भाजपाने पश्चिम बंगाल जिंकण्याचं स्वप्न कसं केलं साकार? १० निर्णायक मुद्दे
14
ममता बॅनर्जींनी रोखलेल्या...! भाजप सत्तेत आल्याने पश्चिम बंगालमध्ये या ७ योजना लागू होणार; गरिबांना मिळणार मोठा दिलासा
15
पार्टीचा बहाणा अन् दारूत सल्फास; १० वर्षांचा संसार संपवून पत्नी प्रियकरासोबत पळाली, ८ दिवसांनी उघड झालं गुपित
16
थलपती विजयच्या ड्रायव्हरचा मुलगा झाला आमदार! तिकीट मिळालं तेव्हा स्टेजवर ढसाढसा रडला होता...
17
Kangana Ranaut : राहुल गांधींसोबतच्या लग्नाच्या अफवेवर कंगना राणौत संतापली; म्हणाली, "लाज वाटली पाहिजे"
18
जागतिक खळबळ: अमेरिकन युद्धनौकेवर इराणचा क्षेपणास्त्र हल्ला; दोन मिसाईल डागली, शस्त्रसंधी तुटली, युद्धाला पुन्हा तोंड फुटणार
19
दोन वर्षातच पश्चिम बंगालमध्ये असं काय बदललं की ममता बॅनर्जींना सत्तेवरून जावं लागलं?
20
भवानीपूर: ममता बॅनर्जी अन् सुवेंदू अधिकारी एकाचवेळी मतमोजणी केंद्रावर; मोठ्या प्रमाणावर पोलीस फोर्स तैनात
Daily Top 2Weekly Top 5

तत्त्वाला काही बूड आहे की नाही?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2019 02:45 IST

स्वातंत्र्यप्राप्तीपासून अगदी आजवर भाषाविषयक भारतीय (म्हणजे नेमके काय, हाही प्रश्नच आहे.) धोरण व त्याची कार्यवाही याबाबतीत एकूण उल्हासच आहे.

वसंत केशव पाटील, ज्येष्ठ साहित्यिक, अनुवादकार - सांगली.स्वातंत्र्यप्राप्तीपासून अगदी आजवर भाषाविषयक भारतीय (म्हणजे नेमके काय, हाही प्रश्नच आहे.) धोरण व त्याची कार्यवाही याबाबतीत एकूण उल्हासच आहे. भाषा म्हटली की, मातृभाषा, राष्ट्रभाषा, राजभाषा, कार्यालयीन भाषा, विविध माध्यमांची भाषा, ज्ञानभाषा, कूटभाषा, पोटभाषा, बोलीभाषा अशी तिची अनेक रूपे किंवा स्तर समोर येतात. भारत हा बहुभाषिक देश आहे. त्यामुळे एखाद्या भाषेला राष्ट्रभाषा म्हणत तिची सतत भलावण करणे हास्यास्पद आहे. भाषा म्हणजे अभिव्यक्ती आणि ती कशी करायची हा व्यक्तीचा अधिकार आहे. हे एवढे लक्षात घेतले तर वाद व्हायचे कारणच नाही. पण अलिकडे कुणी काय खावे आणि काय खाऊ नये, हे नेते ठरवू लागले आहेत. भाषेच्या बाबतीत तेच सुरू आहे.नेत्यांचा विषय निघाला आहे तर, महात्मा गांधी, विनोबा, नेहरू, राजेंद्रप्रसाद, काका कालेलकर, मामा वरेरकर, राजगोपालाचारी, कृपलाणी, सुब्रमण्यम भारती, राम मनोहर लोहिया, नरेंद्र देव, के. डी. मालवीय, के. एम. मुन्शी, जमनालाल बजाज, केशवचंद्र सेन, गणेश शंकर विद्यार्थी, पुरषोत्तम टंडन, दयानंद सरस्वती, भारतेंदु, माखनलाल चतुर्वेदी आदींचे भाषाविषयक विचार तरी आजच्या किती नेत्यांनी वाचले असतील याबाबत शंकाच आहे.