शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

..तर ट्विटरच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना होणार अटक, त्या अकाउंट्सवरून मोदी सरकार आक्रमक

By बाळकृष्ण परब | Updated: February 11, 2021 10:23 IST

Indian Government Vs Twitter : सोशल मीडियावरील लोकप्रिय प्लॅटफॉर्म असलेल्या ट्विटर आणि केंद्र सरकारमधील मतभेद विकोपाला गेले आहेत.

ठळक मुद्देप्रक्षोभक माहिती प्रसारित करणाऱ्या ट्विटर अकाऊंटविरोधील कारवाईबाबत केली जाणार नाही कुठल्याही प्रकारची तडजोड कंपनीला स्थानिक कायद्यांचे पालन करावे लागेल, असेही सरकारने स्पष्ट केले होतेट्विटर या प्रकरणाला न्यायालयात नेण्याच्या तयारीत आहे. कंपनीकडून यासाठी अभिव्यक्तीच्या स्वातंत्र्याचा हवाला दिला जात आहे

नवी दिल्ली - सोशल मीडियावरील लोकप्रिय प्लॅटफॉर्म असलेल्या ट्विटर आणि केंद्र सरकारमधील मतभेद विकोपाला गेले आहेत. केंद्र सरकारनेट्विटरवरील प्रक्षोभक माहिती प्रसारित करणारी अकाउंट्स सेंसर करण्याची मागणी केली होती. मात्र ट्विटरकडून त्याकडे काणाडोळा करण्यात येत असल्याचे दिसत आहे. त्यावरून सरकारने आपली भूमिका कठोर केली असून, ट्विटरने आदेशांचे पालन न केल्यास ट्विटरच्या काही वरिष्ठ अधिकाऱ्यांना अटक केली जाईल, असा इशारा दिला आहे. (Modi government is aggressive against those Twitter accounts)प्रक्षोभक माहिती प्रसारित करणाऱ्या ट्विटर अकाऊंटविरोधील कारवाईबाबत कुठल्याही प्रकारची तडजोड केली जाणार नाही, असे सरकारने स्पष्ट केले आहे. इंग्रजी वृत्तपत्र टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार सरकारने सांगितले की, याबाबत संयमाचा अंत होत चालला आहे. भारताने बुधवारी ट्विटरला प्रक्षोभक माहिती हटवण्याच्या मुद्द्यावरून फटकारले होते. कंपनीला स्थानिक कायद्यांचे पालन करावे लागेल, असेही सरकारने स्पष्ट केले होते. तसेच अनेक खासदारांनी स्वदेशी अ‍ॅप koo चा वापर करण्याचे आवाहन आपल्या समर्थकांना केले होते.दरम्यान, मिळत असलेल्या माहितीनुसार ट्विटर या प्रकरणाला न्यायालयात नेण्याच्या तयारीत आहे. कंपनीकडून यासाठी अभिव्यक्तीच्या स्वातंत्र्याचा हवाला दिला जात आहे. मात्र कंपनीने सरकारच्या आदेशावर अंशत: अंमलबजावणी करताना सरकारकडून सांगण्यात आलेल्या अकाऊंटपैकी अर्धी अकाउंट्स बंद केली आहेत.या मुद्द्यावरून इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या सचिवांनी ग्लोबल पॉलिसी ट्विटरचे उपाध्यक्ष मोनिक मेश आणि डेप्युटी जनरल कौन्सिल आणि उपाध्यक्ष (कायदे) जिम बेकर यांच्यासोबत व्हर्चुअल संवाद साधत बैठक घेतली होती. या बैठकीनंतर मंत्रालयाकडून एक पत्रक प्रसिद्ध करण्यात आले होते. त्यामधून ट्विटर आदेशाचे पालन करण्यास दर्शवलेली अनिच्छा आणि अंमलबजावणीस केलेला उशीर याबाबत निराशा व्यक्त केली होती. तसेच भारतात घटना आणि कायदा सर्वोच्च असल्याचे स्पष्ट केले होते.

टॅग्स :Central Governmentकेंद्र सरकारTwitterट्विटरSocial Mediaसोशल मीडिया