- बलवंत तक्षकचंदीगड : जर पहिल्या पत्नीला काही आक्षेप नसेल तर दुसऱ्या पत्नीला मृत पतीचे कुटुंब निवृत्तिवेतन आणि इतर लाभांचे हक्क आहेत. पंजाब व हरियाणा उच्च न्यायालयाने हा निवाडा लष्करी जवानाच्या दुसऱ्या पत्नीच्या खटल्यात दिला. लष्करातील जवान महेंद्र सिंह यांनी पहिल्या पत्नीला घटस्फोट न देता दुसरा विवाह केला होता. महेंद्र सिंह यांच्या निधनानंतर त्यांची पत्नी दलजित कौर यांनी पेन्शन आणि इतर लाभ मिळण्याची मागणी केल्यावर लष्कराच्या दप्तरांत पत्नीचे नाव बंत कौर नोंदलेले होते. हेही स्पष्ट झाले की, बंत कौर यांनी महेंद्र सिंह यांना घटस्फोट न देताच दुसरे लग्न केले होते. या परिस्थितीत महेंद्र सिंह यांनी दलजित कौर यांच्याशी दुसरे लग्न केले. महेंद्र सिंह यांच्या निधनानंतर लष्कराने नियमांचा आधार घेत दलजित कौर यांना स्पष्ट नकार दिला.
...तर दुसऱ्या पत्नीला पेन्शनचा हक्क; हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2021 07:22 IST