शहरं
Join us  
Trending Stories
1
Lokmat Exclusive: ठाकरे मुंबई नक्कीच गमावतील, महापालिकांमध्ये निवडणुकोत्तर नवीन समीकरणे: CM देवेंद्र फडणवीस
2
IT हब की नरकाचे द्वार? बेंगळुरूत पहाटे ३:३० वाजताही वाहतूक कोंडी सुटेना; दोन-दोन तास...
3
५ वर्षांचं अफेअर, ३ मुलं, पण इन्स्टावरील प्रेमासाठी घर सोडलं; पतीनेच स्वहस्ते लावून दिलं पत्नीचं दुसरं लग्न!
4
Crypto वर देखरेख ठेवणं कठीण! RBI नंतर आता आयकर विभागानंही हात वर केले, प्रकरण काय?
5
आजचे राशीभविष्य : शुक्रवार ९ जानेवारी २०२६; उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल, आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल
6
९ वर्षांत ७५ हजार कोटी खर्च केले तर मग विकास कुठे?: अजितदादांचा भाजपा नेत्यांना थेट सवाल
7
तू तिच्या गाडीला अपघात कर, मी तिला वाचवतो...; तरुणीला इम्प्रेस करण्याचा प्लॅन, सफलही झाला पण...
8
“स्वत:च्या भरवशावर बहुमत मिळवू; परंतु साथीदारांना सोडणार नाही”; CM फडणवीस यांचा टॉक शो
9
ठाकरेंच्या गुहेत एकनाथ शिंदे यांची कठीण परीक्षा; भाजपा मदतीने तगडे आव्हान पार केले तर...
10
आंदोलकांचा इराणच्या राजधानीवर कब्जा! रात्रीच्या अंधारात सरकारी कार्यालये ताब्यात, तेहरानने हवाई क्षेत्र बंद केले...
11
“सत्ताधाऱ्यांची हुकूमशाही, मी पाहिलेली आजवरची ही सर्वांत घाणेरडी निवडणूक”: अमित ठाकरे
12
…तर अमेरिका भारतावर ५०० टक्के टॅरिफ लादणार; डोनाल्ड ट्रम्प प्रशासन धक्का देण्याच्या तयारीत
13
ममतांच्या ‘वॉर रूम’वर ईडीचा पहाटे ६ वाजता छापा; प्रशांत किशोर स्थापित ‘आयपॅक’वर धाडी
14
डोनाल्ड ट्रम्प यांच्या टार्गेटवर पुन्हा एकदा भारत; अमेरिका आंतरराष्ट्रीय सौर आघाडीतूनही बाहेर
15
महायुतीने चार प्रभाग निवडणुकीआधीच गमावले; बंडखोरीची केली चिंता, पण बसला मोठा फटका
16
काँग्रेस-वंचित युतीकडे ३६ जागांवर उमेदवारच नाही; काँग्रेसकडे २०, वंचितकडे १६ उमेदवारांचा अभाव
17
कोणाचे डिपॉझिट होणार जप्त? ९ पालिकांच्या तिजोरीत २ कोटी ६२ लाख जमा; मुंबईत १७०० उमेदवार
18
महायुतीत १५३ कोट्यधीश उमेदवार, चंदन शर्मा सर्वात श्रीमंत; सोनाली जाधवांकडे फक्त ४४ हजार
19
माजी आमदार, महापौरांच्या संपत्तीत झाली लक्षणीय वाढ; मालमत्तेचा विषय चर्चेचा ठरतोय
20
४ उमेदवारांनी निवडला समाजसेवा ‘व्यवसाय’; शिक्षणासह व्यावसायिक पार्श्वभूमीचे चित्र स्पष्ट
Daily Top 2Weekly Top 5

...तर खुल्या वर्गातील पदांसाठीही राखीव प्रवर्गांतील उमेदवार पात्र; सर्वोच्च न्यायालयाचा निकाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2026 10:26 IST

१९९२ मधील इंद्रा साहनी प्रकरणातील ऐतिहासिक निकालाचा आधार घेत हा निर्णय देण्यात आला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्ग (ओबीसी) आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (इडब्ल्यूएस) या प्रवर्गांतील उमेदवारांनी खुल्या प्रवर्गासाठी ठरवलेली कटऑफ गुणमर्यादा मिळवली, तर ते खुल्या प्रवर्गातील पदांसाठी पात्र ठरतात, असा महत्त्वपूर्ण निर्णय न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती ऑगस्टीन जी. मसीह यांच्या खंडपीठाने हा नुकताच निर्णय दिला. 

१९९२ मधील इंद्रा साहनी प्रकरणातील ऐतिहासिक निकालाचा आधार घेत हा निर्णय देण्यात आला आहे. सहानी प्रकरणातील निकालात सरकारी नोकऱ्यांमध्ये ओबीसींना २७ टक्के आरक्षण देण्यात आले होते.

राजस्थान उच्च न्यायालयाने काही पदांच्या भरतीदरम्यान राखीव प्रवर्गातील उमेदवारांना, खुल्या प्रवर्गाच्या कट ऑफपेक्षा अधिक गुण असूनही, खुल्या प्रवर्गातील पदांवर नियुक्ती नाकारली होती. याविरोधात खंडपीठाने राखीव प्रवर्गातील उमेदवारांच्या बाजूने निकाल दिला. मात्र, राजस्थान उच्च न्यायालयाने हा मुद्दा सर्वोच्च न्यायालयात नेला. उमेदवारांना खुल्या प्रवर्गातील पदांवर संधी दिल्यास त्यांना दुहेरी लाभ मिळेल, असा युक्तिवाद केला होता.

याप्रकरणाचा निकाल देताना न्यायमूर्ती दत्ता यांनी स्पष्ट केले की, ओपन (खुला) हा शब्द सर्वसमावेशक आहे. ओपन श्रेणीत ज्या पदांची भरती केली जाते, ती कोणत्याही विशिष्ट प्रवर्गात मोडत नाही. 

राजस्थान  खंडपीठाचा निर्णय कायम ठेवत सर्वोच्च न्यायालयाने आरक्षणाची उपलब्धता ही राखीव प्रवर्गातील उमेदवाराला गुणवत्तेच्या आधारे खुल्या प्रवर्गातील पदासाठी विचारात घेण्यास अडथळा ठरू शकत नाही, असे नमूद केले. 

उमेदवारांसाठी महत्त्वाचे...

राखीव प्रवर्गातील उमेदवाराने खुल्या प्रवर्गासाठी ठरवलेल्या कटऑफपेक्षा जास्त गुण मिळवले, तर त्याला मुलाखतीसाठी खुल्या प्रवर्गातच धरले पाहिजे. मात्र, लेखी परीक्षा मुलाखतीचे गुण जर खुल्या प्रवर्गाच्या कटऑफपेक्षा कमी ठरले तर उमेदवाराचा विचार त्याच्या संबंधित राखीव प्रवर्गात केला जावा, असेही न्यायालयाने म्हटले. आरक्षित प्रवर्गात उमेदवाराने खुल्या प्रवर्गात जास्त गुण मिळवले तर तो ओपन पदासाठी पात्र ठरेल. त्याचा विचार खुल्या प्रवर्गातूनच व्हायला हवा, असेही नमूद केले आहे.

 

English
हिंदी सारांश
Web Title : Reserved Category Candidates Scoring Higher Than Open Category Cutoff Eligible: SC

Web Summary : Supreme Court ruled reserved candidates scoring above open cutoff are eligible for open positions. Rajasthan HC's denial was overturned, citing 1992 Indra Sawhney case. Open category is inclusive; merit prevails. Candidates exceeding open cutoff in written exams/interviews considered in open category.
टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालय