शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

"...तर त्यांना देशात फिरणेही कठीण होईल!" मोहन भागवत यांच्या बद्दल हे काय बोलले मल्लिकार्जुन खर्गे?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2025 15:04 IST

काँग्रेस पक्षाचे नवे मुख्यालय 'इंदिरा भवन'चे उद्घाटन झाले आहे. सोनिया गांधी यांनी  बुधवारी या कार्यालयाचे उद्घाटन केले. या समारंभात ...

काँग्रेस पक्षाचे नवे मुख्यालय 'इंदिरा भवन'चे उद्घाटन झाले आहे. सोनिया गांधी यांनी  बुधवारी या कार्यालयाचे उद्घाटन केले. या समारंभात बोलताना राहुल गांधी आणि काँग्रेस अध्यक्ष खर्गे यांनी भाजप-आरएसएसवर जोरदार निशाणा साधला. खर्गे यांनी आपल्या भाषणात सरसंघचालक मोहन भागवत यांच्या 'खरे स्वातंत्र्य' या विधानावर जोरदार निशाणा साधला. "जर ते अशी विधाने करत राहिले, तर त्यांना देशात फिरणेही कठीण होईल," असे खर्गे यांनी म्हटले आहे.

"स्वातंत्र्य आंदोलनात काहीही योगदान नाही" -काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे नव्या काँग्रेस मुख्यालयाच्या उद्घाटनानंतर पक्ष नेत्यांना संबोधित करताना म्हणाले, "आरएसएस आणि भाजपच्या लोकांना १९४७ मध्ये मिळालेले स्वातंत्र्य आठवत नाही, कारण त्यांच्या वैचारिक पूर्वजांचे स्वातंत्र्य चळवळीत कोणतेही योगदान नव्हते. त्यांनी कधी स्वातंत्र्यासाठी लढा दिला नाही, कधी तुरुंगात गेले नाही, म्हणून त्यांना स्वातंत्र्याबद्दल काही आठवतच नाही. आमच्या लोकांनी लढा दिला होता, प्राण गमावले होते, यामुळे आम्हाला स्वातंत्र्य आठवते."

तत्पूर्वी, मोहन भागवत सोमवारी म्हणाले होते की, अयोध्येत रामललाच्या प्रतिष्ठापनेची तिथी 'प्रतिष्ठा द्वादशी' म्हणून साजरी करायला हवी. कारण अनेक शतकांपासून होणाऱ्या शत्रूच्या आक्रमनांणा तोंड देणाऱ्या देशाला या दिवशी खरे स्वातंत्र्य मिळाले. भागवतांच्या या विधानावर निशाणा साधत खर्गे म्हणाले की, स्वातंत्र्य मिळूनही ते हे स्वीकारत नाहीत, ही शरमेची गोष्ट आहे."

"देशात फिरणेही कठीण होईल" -खर्गे म्हणाले, "मी भागवतांच्या वक्तव्याचा निषेध करतो आणि ते अशीच विधाने करत राहीले, तर त्यांचे भारतात फिरणेही कठीण होईल." मात्र का कठीण होईल हे त्यांनी सांगितले नाही.

टॅग्स :Mallikarjun Khargeमल्लिकार्जुन खर्गेMohan Bhagwatमोहन भागवतcongressकाँग्रेसRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघ