शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
3
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना 'इमर्जन्सी' अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
4
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
5
"जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
6
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
7
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
8
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
9
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
10
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
11
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
12
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
13
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
14
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
15
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
16
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
17
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
18
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
19
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
20
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
Daily Top 2Weekly Top 5

"...तर सार्वजनिक जीवनातून संन्यास घेईन"! पत्नीवरील आरोपांवरून आसामचे CM हिमंता स्पष्टच बोलले

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2023 18:51 IST

"आपल्या पत्नीवरील आरोप सिद्ध झाल्यास, आपण सार्वजनिक जीवनातून निवृत्त होऊ, असे हिमंता बिस्वा सरमा यांनी म्हटले आहे."

काँग्रेसने केलेल्या आरोपांनंतर आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा आणि गौरव गोगोई यांच्यात ट्विटर (आता एक्स) वॉर सुरू झाले आहे. यावर बोलताना, आपल्या पत्नीवरील आरोप सिद्ध झाल्यास, आपण सार्वजनिक जीवनातून निवृत्त होऊ, असे हिमंता बिस्वा सरमा यांनी म्हटले आहे.

आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्या पत्नी एका मीडिया आणि मनोरंजन कंपनीसोबत जोडल्या गेल्या आहेत. या कंपनीला अन्न प्रक्रिया मंत्रालयाकडून एका विशेष केंद्रीय योजनेंतर्गत कर्जाशी संबंधित सबसिडी म्हणून 10 कोटी रुपये मिळाल्याचा आरोप काँग्रेससने बुधवारी केला. मात्र बिस्वा सरमा यांनी विरोधकांचे हे आरोप फेटाळून लावले आहेत.

गौरव गोगोई यांना मुख्यमंत्री सरमांवर निशाणा - लोकसभेतील काँग्रेसचे उपनेते तथा खासदार गौरव गोगोई यांनी एक्सवर पोस्ट करत, "भारतातील शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी किसान संपदा योजना सुरू केली आहे. पण आसामच्या मुख्यमंत्र्यांनी आपल्या प्रभावाचा वापर करून, आपल्या पत्नीच्याच कंपनीला कर्जाशी संबंधित सब्सिडीचा भाग म्हणून 10 कोटी रुपये देण्यास मदत केली," असा आरोप केला आहे. एवढेच नाही तर, "केंद्र सरकारच्या योजना भाजपला समृद्ध करण्यासाठी आहेत का?" असा सवालही त्यांनी केला आहे. 

हिमंता बिस्व सरमा यांचा पलटवार -यावर उत्तर देत, हिमंता बिस्व सरमा यांनी एक्सवर पोस्ट करत म्हटले आहे, "जर पत्नीच्या कंपनीला केंद्राची सब्सिडी मळाल्याचे आरोप सिद्ध झाल्यास, आपण सार्वजनिक जीवनातून सन्यास घेऊ." मुख्यमंत्री सरमा यांनी काँग्रेसचे आरोप फेटाळत, आपली कंपनी ज्या कंपनीशी जोडली गेली आहे, त्या कंपनीला कसल्याही प्रकारची सब्सिडी मिळाली नसल्याचेही सरमा यांनी म्हटले आहे. 

तत्पूर्वी, काँग्रेसने काही कागदपत्रांच्या माध्यमाने दावा केला होता की, 2021 मध्ये सरमा मुख्यमंत्री झाल्यानंतर, त्यांच्या पत्नी रिंकी भुइंया सरमा यांच्या कंपनीने आसामच्या नौगांवमध्ये 50 बिघे शेतजमीन खरेदी केली होती आणि काही दिवसांतच या जमिनीचे औद्योगिक जमिनीत रूपांतर करण्यात आले.

टॅग्स :AssamआसामBJPभाजपाcongressकाँग्रेसPoliticsराजकारण