आधी संसदीय नेता मग मंत्रिमंडळ

By Admin | Updated: May 17, 2014 17:48 IST2014-05-17T13:48:59+5:302014-05-17T17:48:42+5:30

मोदींच्या शपथविधीची तारीख अद्याप ठरली नसल्याचे राजनाथ सिंह यांनी स्पष्ट केले

Then the Cabinet of the Cabinet first | आधी संसदीय नेता मग मंत्रिमंडळ

आधी संसदीय नेता मग मंत्रिमंडळ

>ऑनलाइन टीम
नवी दिल्ली दि. १७ -  येत्या २० तारखेला (मंगळवार) भाजपच्या संसदीय  मंडळाची अंतिम बैठक होणार असून यामध्ये संसदीय मंडळाच्या प्रमुख नेत्याची निवड होणार आहे. त्यानंतरच नरेंद्र मोदींच्या शपथविधीची तारीख तसेच मंत्रीमंडळातील सदस्यांची निवड होणार असल्याचे भाजपाध्यक्ष राजनाथ सिंग यांनी स्पष्ट केले.
शनिवारी राजधानी दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषददेरम्यान बोलताना राजनाथ सिंग यांनी भाजपाला मिळालेल्या यशाबद्दल सर्व मतदारांचे आभार मानले तसेच अभिनंदनही केले. सशक्त, स्वाभिमानी आणि स्वावलंबी भारत निर्माण करणे हाच भाजपाचा संकल्प असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी यांनी मोदींना पुष्पगुच्छ देऊन तसेच मिठाई भरवून त्यांचे अभिनंदन केले. तर मोदींनीही आडवाणींचे आशीर्वाद घेतले. 

Web Title: Then the Cabinet of the Cabinet first

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.