त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2025 07:28 IST2025-04-29T07:27:09+5:302025-04-29T07:28:09+5:30
सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी त्यांच्या भागात वास्तव्यास असलेल्या किंवा प्रवास करणाऱ्या काश्मिरी नागरिकांच्या सुरक्षेची काळजी घ्यावी, त्यांना त्रास होऊ नये यासाठी उपाययोजना करावी, अशी मागणी विधानसभेने मंजूर केलेल्या ठरावाद्वारे करण्यात आली.

त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
सुरेश एस डुग्गर
जम्मू : सोमवारी जम्मू-काश्मीर विधानसभेत पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या पर्यटकांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला म्हणाले की, मुख्यमंत्री म्हणून सुरक्षेची जबाबदारी माझ्यावर होती. या लोकांच्या कुटुंबियांची मी कशी माफी मागू? माझ्याकडे शब्द नाहीत. सामाजिक सलोखा बिघडविण्याचा कट उधळून लावण्याचा निर्धार व्यक्त करणारा ठराव यावेळी मंजूर करण्यात आला.
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
‘काश्मिरींना त्रास होऊ नये याची काळजी घ्यावी’
सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी त्यांच्या भागात वास्तव्यास असलेल्या किंवा प्रवास करणाऱ्या काश्मिरी नागरिकांच्या सुरक्षेची काळजी घ्यावी, त्यांना त्रास होऊ नये यासाठी उपाययोजना करावी, अशी मागणी विधानसभेने मंजूर केलेल्या ठरावाद्वारे करण्यात आली.
सर्व राजकीय पक्षांनी, संघटनांनी शांतता राखावी, हिंसाचार, विद्वेष पसरेल, अशी वक्तव्ये करू नयेत.
भारतीय संविधानातील मूल्ये टिकवण्यासाठी सामूहिक प्रयत्न करावेत, असेही या ठरावात म्हटले आहे.मृतांना श्रद्धांजली वाहणारा ठराव सुरिंदर चौधरी यांनी मांडला, तो एकमताने मंजूर झाला.