दानोळीत महावितरणच्या साहित्याची चोरी
By Admin | Updated: March 23, 2017 17:19 IST2017-03-23T17:19:30+5:302017-03-23T17:19:30+5:30
जयसिंगपूर : दानोळी (ता. शिरोळ) येथील विद्युत महावितरण कंपनीच्या ट्रान्सफॉर्मरमधील तांब्याच्या तारेसह ऑईलची चोरी झाल्याची तक्रार जयसिंगपूरपोलिसांत नोंद झाली आहे. सुमारे २४ हजार ७00 रुपये किमतीचा हा मुद्देमाल आहे. याबाबतची तक्रार कनिष्ठ अभियंता प्रवीण सुरवशे यांनी पोलिसांत दिली. याबाबत पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, बुधवारी (दि. २२) मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी वारणा नदीकाठी असणार्या पंचगंगा जॅकवेलवरील ट्रान्सफॉर्मरमधील ६० किलो वजनाची तांब्याची तार व १०० लिटर ऑईल, असा मुद्देमाल लंपास केला. अधिक तपास पोलिस नाईक अनिल चव्हाण करीत आहेत.

दानोळीत महावितरणच्या साहित्याची चोरी
ज सिंगपूर : दानोळी (ता. शिरोळ) येथील विद्युत महावितरण कंपनीच्या ट्रान्सफॉर्मरमधील तांब्याच्या तारेसह ऑईलची चोरी झाल्याची तक्रार जयसिंगपूरपोलिसांत नोंद झाली आहे. सुमारे २४ हजार ७00 रुपये किमतीचा हा मुद्देमाल आहे. याबाबतची तक्रार कनिष्ठ अभियंता प्रवीण सुरवशे यांनी पोलिसांत दिली. याबाबत पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, बुधवारी (दि. २२) मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी वारणा नदीकाठी असणार्या पंचगंगा जॅकवेलवरील ट्रान्सफॉर्मरमधील ६० किलो वजनाची तांब्याची तार व १०० लिटर ऑईल, असा मुद्देमाल लंपास केला. अधिक तपास पोलिस नाईक अनिल चव्हाण करीत आहेत. (प्रतिनिधी)