शहरं
Join us  
Trending Stories
1
अग्रलेख: महायुतीत ठिणगी! भाजप आणि अजित पवार गटाची युती केवळ नेत्यांच्या पातळीवर
2
आजचे राशीभविष्य - 29 मे 2024; कुटुंबीयांशी संघर्ष होण्याची शक्यता, रागावर नियंत्रण ठेवा
3
मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनसाठी घणसोली येथे ३९४ मीटर लांबीचा बोगदा पूर्ण
4
डोंबिवली स्फोट, घाटकोपर होर्डिंग, राजकोट आग.. ­नाहक जीव जातात; जबाबदार कोण?- प्रशासन!
5
Success Story: रोल्स रॉयस ते हेलिकॉप्टरचे मालक, शेतकऱ्याच्या मुलानं शून्यातून उभं केलं जग
6
‘अशी’ करा स्वामी समर्थ महाराजांची मानस पूजा; होईल अपार कृपा, अशक्यही शक्य करतील स्वामी!
7
१२ वर्षांनी गजलक्ष्मी राजयोग: ८ राशींवर लक्ष्मीकृपा, उत्पन्न वाढ; नवी नोकरीची संधी, शुभ होईल
8
अन्वयार्थ विशेष लेख: काश्मीरचे स्वर्गीय सौंदर्य आणि विकासाचा ‘तोल’
9
१० जूनपर्यंत कोस्टल रोडची दुसरी बाजू खुली : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती
10
LIC चा केंद्राला ३,६६२ कोटींचा लाभांश; RBI देखील सरकारला देणार २.११ लाख कोटी
11
१ ते ५ लाखांत बालकांची विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; ८ महिलांसह ११ अटकेत
12
रुग्णालयातील अधीक्षक पद वैद्यकीय शिक्षण विभाग भरणार; अधिष्ठाताच्या अधिकारांवर गदा
13
राजधानी दिल्ली होरपळली! पारा विक्रमी ४९.९ अंशांवर; राजस्थान, हरयाणात तापमान ५०च्या पुढे
14
डोंबिवलीतील धोकादायक उद्योगांचे पाताळगंगा, अंबरनाथला स्थलांतर: उद्योगमंत्री उदय सामंत
15
राष्ट्रवादीने पत्ते उघडले; शिक्षक मतदारसंघासाठी सुनिल तटकरेंनी केली उमेदवाराच्या नावाची घोषणा
16
रवींद्र धंगेकर यांचा भाजपवर आणखी एक गंभीर आरोप; ९९६ कोटींचा निधी घेतला आणि...
17
उत्तर कोरियाच्या हेरगिरी उपग्रहाचं प्रक्षेपण अपयशी, उड्डाण करताच काही सेकंदात उडाल्या रॉकेटच्या ठिकऱ्या
18
‘’हवे तेवढे पैसे घ्या, पण मला मारू नका’’, अपघातानंतर ‘बाळा’ने दाखवला पैशांचा माज, प्रत्यक्षदर्शीचा दावा  
19
राजकोट अग्नितांडव! गेम झोनच्या मालकाचाही जळून मृत्यू, आईच्या DNA मुळे पटली ओळख...

रेल्वेतून १४ कोटींच्या वस्तूंची चोरी, चादरी, टॉवेल्स, उशांचे अभ्रे गायब

By ऑनलाइन लोकमत | Published: January 06, 2019 8:39 AM

सारे संशयास्पद : चादरी, टॉवेल्स, उशांचे अभ्रे गायब

नवी दिल्ली : फुटकळ वस्तूंची चोरी करणाऱ्यांना ‘चिंधीचोर’अशा शब्दांत हिणविले जाते. रेल्वे प्रवासात एका वर्षात १४ कोटी रुपये किमतीच्या चादरी, ब्लँकेट टॉवेल्स आणि उशांचे अभ्रे चोरीला गेले आहेत. याबद्दल रेल्वे प्रवाशांवर संशय घ्यावा की, कर्मचाºयांवर? की डब्यांमध्ये घुसून भुरटेपणा करणाºया चोरांवर? असा प्रश्न उभा राहिला आहे.

सन २०१७-१८ मध्ये १२ लाख ८३ हजार ४१५ टॉवेल्स, ४ लाख ७१ हजार ७७ चादरी आणि ३ लाख १४ हजार ९५२ अभ्रे चोरीला गेली, तसेच ५६ हजार २८७ उशा, ४६ हजार ५१५ कांबळी लंपास झाल्या. वातानुकूलित डब्यांमध्ये प्रवाशांना २ चादरी, १ उशी, उशीचा अभ्रा, टॉवेल आणि ब्लँकेट दिले जाते. प्रवासी उतरताना या वस्तू जागीच सोडून देतात. नंतर कर्मचारी त्या जमा करून नेतो. मात्र, ‘कॅग’च्या अहवालात दरवर्षी अमुक-तमुक संख्येने टॉवेल, चादरी चोरीला गेल्याचा उल्लेख असल्याने ही ‘चिंधीचोरी’ नेमके करते तरी कोण? अशी शंका निर्माण झाली आहे. ही ‘चिंधीचोरी’ रोखण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने नवे फर्मान काढले आहे. रेल्वे राज्यमंत्री राजेन गोहांई यांच्या माहितीनुसार, ‘एसी कोच’मधील प्रवाशांकडून त्यांचे स्थानक येण्यापूर्वी अर्धा तास आधी या वस्तू परत घेतल्या जातील. ही माहिती लोकसभेतही देण्यात आली. रेल्वे प्रवासात टॉवेल्सची चोरी सर्वाधिक होते.प्रशासन अनभिज्ञमंत्र्यांनी काय सांगितले आहे, याविषयी अनभिज्ञ असलेले उत्तर रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी दीपक कुमार म्हणाले की, प्रवाशांकडून एकदम या वस्तू घेतल्या जातात असे नाही. १० मिनिटे आधी डब्यांमधील कर्मचारी प्रवाशांना सूचना देतो. प्रवासी गाडीतून उतरण्याआधी त्या कर्मचाºयाकडे सोपवितात.

टॅग्स :railwayरेल्वेCrime Newsगुन्हेगारी