राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराचे थाटात वितरण

By Admin | Updated: May 4, 2015 00:41 IST2015-05-04T00:41:12+5:302015-05-04T00:41:12+5:30

‘कोर्ट’, ‘एलिझाबेथ एकादशी’, ‘ख्वाडा’, ‘किल्ला’ अशा अनेक मराठी चित्रपटांनी रविवारच्या ६२ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यावर आपली मोहोर उमटवली

Theater distribution of the National Film Awards | राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराचे थाटात वितरण

राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराचे थाटात वितरण

नवी दिल्ली : ‘कोर्ट’, ‘एलिझाबेथ एकादशी’, ‘ख्वाडा’, ‘किल्ला’ अशा अनेक मराठी चित्रपटांनी रविवारच्या ६२ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यावर आपली मोहोर उमटवली. चैतन्या ताम्हाणे दिग्दर्शित ‘कोर्ट’ या मराठीपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठीचे सुवर्णकमळ देऊन गौरविण्यात आले. ‘क्वीन’मधील अभिनयासाठी कंगना राणावत हिला सर्वश्रेष्ठ अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला.
येथील विज्ञात भवनात एका शानदार सोहळ्यात राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराचे वितरण करण्यात आले. यावेळी सर्व भाषांत सर्वोत्कृष्ट ठरलेल्या ‘कोर्ट’ला सुवर्णकमळ व अडीच लाख रुपये रोख रुपये देऊन गौरविण्यात आले. ‘एलिझाबेथ एकादशी’ यास सर्वोत्कृष्ट बालचित्रपट, ‘किल्ला’ला विशेष उल्लेखनीय चित्रपट, रवी जाधव दिग्दर्शित ‘मित्रा’स सर्वोत्कृष्ट लघुपटाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. मराठीच्याच ‘ख्वाडा’ या चित्रपटाला स्पेशल ज्युरी अवॉर्ड देऊन गौरविले. विशाल भारद्वाज दिग्दर्शित ‘हैदर’ने सर्वोत्कृष्ट संगीतकार, सर्वोत्कृष्ट गायक, सर्वोत्कृष्ट संवाद, सर्वोत्कृष्ट वेशभूषाकार व सर्वोत्कृष्ट कोरिओग्राफी असे पाच पुरस्कार आपल्या झोळीत टाकले.

Web Title: Theater distribution of the National Film Awards

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.