हाती हार घेऊन युवकाने भेदली पंतप्रधानांची सुरक्षा; कमांडाेंनी राेखले, नंतर स्वीकारला हार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2023 06:33 IST2023-01-13T06:33:45+5:302023-01-13T06:33:53+5:30

या घटनेने पंतप्रधानांच्या सुरक्षेची जबाबदारी ज्यांच्यावर आहे, त्या स्पेशल प्रोटेक्शन ग्रुपचे (एसपीजी) रक्षकही चकित झाले.

The youth breached the Prime Minister's Narendra Modi security with a garland in his hand | हाती हार घेऊन युवकाने भेदली पंतप्रधानांची सुरक्षा; कमांडाेंनी राेखले, नंतर स्वीकारला हार

हाती हार घेऊन युवकाने भेदली पंतप्रधानांची सुरक्षा; कमांडाेंनी राेखले, नंतर स्वीकारला हार

हुबळी : कडक सुरक्षा व्यवस्था भेदून एक मुलगा थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याजवळ पोहोचल्याने खळबळ उडाली आहे. कर्नाटकमधील हुबळी येथे गुरुवारी आयोजिण्यात आलेल्या रोड शोदरम्यान ही घटना घडली.  

मुलगा त्यांच्या अगदी जवळ गेला. तो त्यांना हातातील पुष्पहार देऊ पाहत होता. या घटनेने पंतप्रधानांच्या सुरक्षेची जबाबदारी ज्यांच्यावर आहे, त्या स्पेशल प्रोटेक्शन ग्रुपचे (एसपीजी) रक्षकही चकित झाले; पण त्यांनी लगेचच त्या मुलाला बाजूला सारले. त्याच्या हातातील पुष्पहार सुरक्षा रक्षकांनी घेतला व मग तो पंतप्रधानांना दिला. ही घटना अतिशय गंभीर असल्याचे मत सुरक्षा तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

Web Title: The youth breached the Prime Minister's Narendra Modi security with a garland in his hand