शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

दूधसागर धबधब्यानजीकची दरड हटविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू, रेल्वे गाड्या रद्द

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2023 16:59 IST

प्रकाश बेळगोजी बेळगाव : अतिवृष्टीमुळे दूधसागर धबधब्यानजीक बरगंझा घाटात कॅसलरॉक ते कारंझोळ रेल्वे स्थानकादरम्यान दरड कोसळलेली प्रचंड मोठी दरड ...

प्रकाश बेळगोजीबेळगाव : अतिवृष्टीमुळे दूधसागर धबधब्यानजीक बरगंझा घाटात कॅसलरॉक ते कारंझोळ रेल्वे स्थानकादरम्यान दरड कोसळलेली प्रचंड मोठी दरड हटवण्याचे काम अद्यापही युद्धपातळीवर सुरूच आहे. रेल्वे रुळावरील दगड माती काढण्यात येत असल्यामुळे काही रेल्वे गाड्या अंशतः तर काही पूर्णतः रद्द करण्यात आल्या असल्याची माहिती नैऋत्य रेल्वेच्या हुबळी विभागाने दिली आहे. दरम्यान, आज गुरुवारी सकाळी दक्षिण पश्चिम रेल्वेचे जनरल मॅनेजर संजीव किशोर यांनी दरड कोसळलेल्या ठिकाणी पाहणी केली. तसेच लवकरात लवकर दरड बाजूला काढून काम पूर्ण करण्याचे आदेश दिले आहे.

रद्द करण्यात आलेल्या रेल्वे गाड्या - रेल्वे क्र. 17309 यशवंतपुर - वास्को-द-गामा डेली एक्सप्रेस 29 जुलै 2023 पर्यंत रद्द. रेल्वे क्र. 17310 वास्को-द-गामा - यशवंतपुर डेली एक्सप्रेस 29 जुलै 2023 पर्यंत रद्द. 

अंशतः रद्द रेल्वे गाड्या : रेल्वे क्र. 18047 शालीमार - वास्को-द-गामा अमरावती एक्सप्रेस आज, शालिमार येथून सुटेल आणि एसएसएस हुबळी - वास्को-द-गामा दरम्यान अंशतः रद्द केली जाईल आणि अल्पावधीसाठी ती एसएसएस हुबळी येथे थांबविण्यात येईल. रेल्वे क्र. 18048 वास्को-द-गामा - शालीमार अमरावती एक्सप्रेस 30 जुलै रोजी एसएसएस हुबळी - वास्को-द-गामा दरम्यान अंशतः रद्द केली जाईल आणि अल्पावधीसाठी ती वास्को द गामा ऐवजी एसएसएस हुबळी येथून सुटेल. रेल्वे क्र. 17603/18047 या काचीगुडा - वास्को-द-गामा रेल्वेच्या स्लीप कोचिस उद्या, शुक्रवारी एसएसएस हुबळी - वास्को-द-गामा दरम्यान अंशतः रद्द केल्या जातील आणि अल्पावधीसाठी त्या एसएसएस हुबळी येथे थांबतील. रेल्वे क्र. 17604/18048 या  वास्को-द-गामा - काचीगुडा रेल्वेच्या स्लीप कोचिस उद्या, शुक्रवारी वास्को-द-गामा - एसएसएस हुबळी दरम्यान अंशतः रद्द केल्या जातील आणि अल्पावधीसाठी त्या वास्को द गामा ऐवजी एसएसएस हुबळी येथून सुरू होतील.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरbelgaonबेळगावrailwayरेल्वेDudhsagar waterfallदुधसागर धबधबाlandslidesभूस्खलन