घरी सुरू होती पत्नीची लव्ह स्टोरी, माहिती मिळताच परदेशातून धावत पळत आला पती अन्...!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2024 19:42 IST2024-07-24T19:39:40+5:302024-07-24T19:42:17+5:30
हा संपूर्ण प्रकार तिच्या पतीला समजला. तो तत्काळ परदेशातून घरी परतला. घरी आल्यानंतर त्याने पत्नीला समजावले, मात्र पत्नी ऐकण्यास तयार नव्हती. माग...

घरी सुरू होती पत्नीची लव्ह स्टोरी, माहिती मिळताच परदेशातून धावत पळत आला पती अन्...!
उत्तर प्रदेशातील मुरादाबादमधून एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. येथे एक विवाहित महिला एका पुरुषाच्या प्रेमात पडली. महिलेचा पती परदेशात होता. प्रियकरासोबत राहण्यासाठी ती कुटुंबाच्याही विरोधात गेली. हा संपूर्ण प्रकार तिच्या पतीला समजला. तो तत्काळ परदेशातून घरी परतला. घरी आल्यानंतर त्याने पत्नीला समजावले, मात्र पत्नी ऐकण्यास तयार नव्हती.
यानंतर पंचायत भरवली गेली. संबंधित महिला आणि तिच्या प्रियकराला बोलावण्यात आले. महिलेच्या पतीने तिला सर्वांसमोर तिहेरी तलाक दिला. यानंतर लगेचच तिचे तिच्या प्रियकरासोबत लग्न (निकाह) लावून देण्यात आले.
मात्र, महिलेचे कुटुंबीय या लग्नावर खूश नव्हते. यानंतर, महिलेच्या माहेरच्या लोकांनी पोलिसात जाऊन तक्रार दाखल केली. यात, त्यांनी आपल्या मुलीचे जबरदस्तीने दुसऱ्या पुरुषासोबत लग्न लावून दिल्याचा आरोप त्यांनी केला आहे. टीवी-9 भारतवर्षच्या वृत्तानुसार, हे प्रकरण भोजपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावातील आहे.
संबंधित महिला 15 दिवसांपूर्वी प्रियकराच्या घरी गेली होती. तीने त्याच्यासोबत लग्न करण्याचा तगादा लावला होता. महिलेचा पती सौदी अरेबियामध्ये नोकरी करत होता. पत्नीची लव्हस्टोरी समजल्यानंतर, तो सौदीहून भारतात परतला. त्याने पत्नीला समजावण्याचा बराच प्रयत्न केला. मात्र ती ऐकण्यास तयार नव्हती. अखेर यानंतर पंचायत भरवून प्रकरण संपवण्यात आले.