शहरं
Join us  
Trending Stories
1
१९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी अमोल किर्तीकरांच्या प्रचारात?; Video व्हायरल
2
'महानंद'चे अखेर NDDB कडे हस्तांतरण, पुन्हा रंगणार महाराष्ट्र-गुजरात राजकारण?
3
IPL 2024: लखनौच्या फ्रँचायझीने पोलिसांचे १० कोटी रूपये थकवले; एका सामन्याची फी आहे...
4
अजित पवारांकडून जाहीरपणे समाचार, पण चंद्रकांत पाटलांनी संयम दाखवला; नेमकं काय घडलं?
5
"बेटा, लायकीपेक्षा मोठं घे", शाहरुख खानने राजकुमार रावला घर घेताना दिला होता सल्ला
6
अक्षय्य तृतीया: ‘असे’ कसे करा पूजन; पाहा, शुभ मुहूर्त, अद्भूत योग, महत्त्व अन् मान्यता
7
धक्कादायक! भाजपा सदस्याच्या अल्पवयीन मुलाने केलं मतदान; FB वर पोस्ट केला व्हिडीओ
8
Jupiter Wagons Share Price : रेल्वेसाठी काम करणाऱ्या कंपनीच्या शेअरमध्ये तुफान तेजी; ८ रुपयांवरुन ४०० पार, नफा वाढला
9
...आता महाराष्ट्राचा शाप काय असतो तो मोदीजींनी अनुभवावा; उद्धव ठाकरेंचा इशारा
10
गुरु आदित्य योग: ७ राशींना भाग्यकारक, येणी वसूल होतील; व्यवसायात नफा, नोकरीत पद-पगार वाढ!
11
महाराष्ट्रात महाविकास आघाडी किती जागा जिंकणार? शरद पवारांचं मोठं भाकित, थेट आकडाच सांगितला 
12
'तुमचा पक्ष चालवा ना, दुसऱ्यामध्ये कशाला तोंड घालता'; शरद पवारांचे मोजक्या शब्दात अजितदादांना प्रत्युत्तर
13
९ वर्षांपासून फरार, FBI ने गुजराती तरुणावर ठेवले २०८००००० रुपयांचे बक्षीस, कोणता गुन्हा केलाय?
14
ऋतुजा बागवेची नवीन हिंदी मालिका 'माटी से बंधी डोर', प्रोमोला मिळतेय पसंती
15
"मी शब्द पाळला, ७२ तासांसाठी सरकारमध्ये गेलो..."; अजित पवारांनी उघड केलं गुपित
16
अमेरिका भारतातील लोकसभा निवडणुकीत ढवळाढवळ करण्याच्या प्रयत्नात, रशियाचा सनसनाटी दावा
17
TATA चा हा शेअर विकून बाहेर पडतायत गुंतवणूकदार; एक्सपर्ट म्हणाले, "अजून ४५% घसरणार..."
18
कोण आहेत संजीव गोएंका? कधीकाळी पुण्याच्या संघाचे मालक; आता KL Rahul वर संतापले
19
'या' अभिनेत्याने धुडकावली 'दिवार', 'शोले'ची ऑफर; त्याच्या नकारामुळे अमिताभ झाले शहेनशहा
20
"अजितदादांचे माहिती नाही, मी ठाकरेंना चांगलं ओळखतो"; फडणवीसांचा खोचक टोला

"सारा देश आप पर गर्व करेगा"; PM मोदी यांचा थेट संदेशखली पीडिता भाजप उमेदवार रेखा पात्रा यांना फोन, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2024 6:50 PM

Lok Sabha Chunav 2024: रेखा पात्रा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रभू रामचंद्रांचे प्रतीक म्हणत, त्यांचा हात डोक्यावर असल्याने आपल्याला मोठा अभिमान वाटत असल्याचे म्हटले आहे. तसेच, आपला लढा कुण्या पक्षाचा नाही, तर बशीरहाटमधील सर्व पीडितांचा लढा आहे, असेही रेखा यांनी म्हटले आहे.

संदेशखलीतील महिला अत्याचाराच्या मुद्द्यावर थेट ममता सरकारविरोधात लढा उभारणाऱ्या आणि आता लोकसभा निवडणुकीसाठी भाजपच्या उमेदवार असलेल्या रेखा पात्रा यांच्यासोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकताच फोनवरून संवाद साधला. यावेळी रेखा पात्रा यांना शक्तिस्वरूपा म्हणत, संपूर्ण देशाला आपला अभिमान वाटेल, असे मोदी यांनी म्हटले आहे. तर, रेखा पात्रा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रभू रामचंद्रांचे प्रतीक म्हणत, त्यांचा हात डोक्यावर असल्याने आपल्याला मोठा अभिमान वाटत असल्याचे म्हटले आहे. तसेच, आपला लढा कुण्या पक्षाचा नाही, तर बशीरहाटमधील सर्व पीडितांचा लढा आहे, असेही रेखा यांनी म्हटले आहे.

बशीरहाटमधून भाजपनं दिली उमेदवारी - भारतीय जनता पक्षाने रेखा पात्रा यांना पश्चिम बंगालच्या बशीरहाट लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. संदेशखली येथील टीएमसी नेते शाहजहान शेख यांच्या अत्याचाराला बळी पडलेल्या पीडितांपैकी त्या एक आहेत. पंतप्रधान मोदी यांनी त्यांना शक्तीस्वरूपा असे संबोधत, त्यांच्या निवडणुकीच्या तयारीसंदर्भात विचारणा केली. तसेच तिकीट मिळाल्यानंतर आजूबाजूचे वातावरण, लोकांच्या प्रतिक्रिया यासंदर्भातही रेखा पात्रा यांच्यासोबत चर्चा केली. 

'TMC च्या लोकांनी माफी मागितली' -भाजपची उमेदवारी मिळाल्यानंतर शेजारील लोकांच्या प्रतिक्रिया काय होत्या, असा प्रश्न पंतप्रधान मोदींनी विचारला असता, रेखा पात्रा म्हणाल्या, अनेकांनी फोन आणि व्हिडिओ कॉल करून अभिनंदन केले. टीएमसीतीलही अनेकांचे फोन आले. संदेशखलीतील अत्याचाराबद्दल त्यांनी माफीही मागितली आणि पक्षातील वरिष्ठांच्या सांगण्यावरून आपण असे केल्याचेही सांगितले. भाजपची उमेदवारी मिळाल्याबद्दल त्यांनीही रेखा यांचे अभिनंदन केले आहे.

'सर्वांना न्याय मिळवून देण्यासाठी लढणार' -रेखा पात्रा म्हणाल्या, अत्याचार करणारे लोक आपल्या ओळखीचेच आहेत. हे सर्व त्यांनी टीएमसीच्या वरिष्ठ नेत्यांच्या सांगण्यावरून केले. आपल्या मनात त्यांच्याबद्दल कसलाही राग नाही. सर्वांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण लढणार आहोत. यावर पंतप्रधान मोदी यांनी त्यांचे कौतुक केले आणि आजच्या राजकीय युगात, ज्यांनी तुमचे नुकसान केले, त्यांच्या भल्यासाठीही कामना करणे, असे फार कमी बघायला मिळते. तसेच, आपण गौरवशाली इतिहास घडवणार आहात, अशा शुभेच्छाही पंतप्रधान मोदी यांनी रेखा पात्रा यांना दिल्या. 

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४west bengalपश्चिम बंगालNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपा