शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

सर्व्हेतून राजस्थानात भाजप विजयाची भविष्यवाणी, पण दोन कारणांनी टेन्शन वाढवलं!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2023 14:55 IST

सर्वेक्षणात अशाही काही गोष्टी समोर आल्या आहेत, ज्या भाजपसाठी टेन्शनचा विषय ठरू शकतात तर काँग्रेससाठी दिलासादायक ठरू शकतात.

राजस्थानात लवकरच विधानसभा निवडणुका पार पडणार आहेत. यासाठी दोन्ही पक्षांची जोरदार तयारी सुरू आहे. मात्र यातच, एका ताज्या सर्व्हेने भाजपला राजस्थानात सत्ता स्थापनेची संधी मिळू शकते, अशी भविष्यवाणी केली आहे. पीएम मोदींच्या नेतृत्वात प्रचाराची सुरुवात करणाऱ्या भाजपला पूर्ण बहुमत मिळण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. मात्र, सर्वेक्षणात अशाही काही गोष्टी समोर आल्या आहेत, ज्या भाजपसाठी टेन्शनचा विषय ठरू शकतात तर काँग्रेससाठी दिलासादायक ठरू शकतात.

सर्व्हेचा दावा -एबीपी न्यूजने सी व्होटरसह गुरुवारी जारी केलेल्या ओपिनियन पोलमध्ये यावेळी राजस्थानात भाजपचे सरकार येईल, अशी भविष्यवाणी केली आहे. सर्व्हेतील आकडेवारीनुसार, 200 जागांच्या या विधानसभेत भाजपला 109-119 जागा मिळू शकतात. तर काँग्रेसला 78-88 जागा मिलण्याचा अंदाज आहे. तर इतरांना 1-5 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. भाजपाला 46 टक्के मतं मिलू शकतात. तर काँग्रेसला 41 टक्के आणि इतरांच्या खात्यात 13 टक्के मतं जाण्याचा अंदाज आहे.

मुख्यमंत्रीपदासाठी गेहलोत पहिल्या पसंतीचे उमेदवार - या सर्व्हेमध्ये एका बाजूला भाजपच्या विजयाची भविष्यवाणी केली गेली असली तरी, दुसऱ्या बाजूला मात्र अशोक गेहलोतांची जादूही दिसत आहे. ही भाजपसाठी चिंतेची बाब ठरू शकते. सर्व्हेमध्ये लोकांना प्रश्न करण्यात आला की, मुख्यमंत्री पदासाठी आपली पहिली पसंती कुणाला? यावर 35 टक्के लोकांनी गेहलोतांना पसंती दर्शवली. तर २५ टक्के लोकांना वसुंधरा राजे यांना मुख्यमंत्री म्हणून पसंती दर्शविली आहे. तसेच, सचिन पायलट यांना १९ टक्के लोकांना पसंती दर्शवली आहे. 

याचबरोबर, ९ टक्के लोकांनी भाजप खासदार आणि केंद्रीय गजेंद्र सिंह शेखावत यांना मुख्यमंत्रीपदासाठी पहिली पसंती असल्याचे सांगितले. याशिवाय सात टक्के लोकांना भाजप प्रवक्ते राज्यवर्धन सिंह राठोड यांना मुख्यमंत्रीपदी बघायचे आहे.

41 टक्के लोक गेहलोतांच्या कामावर समाधानी -सर्व्हेतील भाजपचे टेन्शन वाढवू शकते अशी आणकी एक गोष्ट म्हणजे, राजस्थानातील बहुतांश लोकांनी गेहलोतांच्या कामावर समाधानी असल्याचे म्हटले आहे. तब्बल 41 टक्के लोकांनी गेहलोतांच्या कामावर अत्यंत समाधानी असल्याचे म्हटले आहे. याच वेळी, 35 टक्के लोकांनी कमी समाधानी असल्याचे म्हटले आहे, 21 टक्के लोकांनी असमाधानी असल्याचे म्हटले आहे. तर 3 टक्के लोकांनी 'माहित नाही' असे म्हटले आहे. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाcongressकाँग्रेसRajasthanराजस्थान