शहरं
Join us  
Trending Stories
1
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
2
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
3
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
4
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
5
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
6
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
7
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
9
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
10
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
11
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
12
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
13
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
14
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
15
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
16
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
17
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
18
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
19
विशेष लेख: बाय बाय अमेरिका, आम्ही चाललो!
20
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?

महिलेचा घटस्फोटाविरुद्धचा संघर्ष पाहून सुप्रीम काेर्ट हेलावले, न्यायमूर्ती म्हणाले, हे अत्यंत अन्यायकारक

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2024 06:05 IST

Supreme Court News: आपल्यापासून वेगळे राहणाऱ्या पतीच्या बाजूने अनेकवेळा घटस्फोटाचे आदेश देणाऱ्या कौटुंबिक न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध प्रदीर्घ न्यायालयीन संघर्ष करणाऱ्या महिलेच्या वेदनांची दखल अखेर सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी घेतली.

 नवी दिल्ली : आपल्यापासून वेगळे राहणाऱ्या पतीच्या बाजूने अनेकवेळा घटस्फोटाचे आदेश देणाऱ्या कौटुंबिक न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध प्रदीर्घ न्यायालयीन संघर्ष करणाऱ्या महिलेच्या वेदनांची दखल अखेर सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी घेतली. न्याययंत्रणा तिच्याविरुद्ध अत्यंत अविवेकपूर्ण ठरली, हे अत्यंत अन्यायकारक आहे, असे या प्रकरणाने हेलावलेल्या न्यायालयाने म्हटले आहे. 

महिलेचा विवाह वर्ष १९९१ मध्ये झाला होता. एका वर्षानंतर तिने मुलाला जन्म दिला आणि त्यानंतर तिच्या पतीने तिला सोडून दिले. त्याने कर्नाटक कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज दाखल केल्यानंतर न्यायालयाने एकदा नाही, तर तीनदा पतीच्या बाजूने घटस्फोट मंजूर केल्याचा आदेश दिला. शिवाय महिला आणि अल्पवयीन मुलाच्या पती कोणतीही पोटगी देत नाहीय, या तथ्याकडेही न्यायालयाने डोळेझाक केली. 

उच्च न्यायालयाने अनेकवेळा या प्रकरणात नव्याने निर्णय देण्याचे आदेश कौटुंबिक न्यायालयाला दिले होते. अखेर हे प्रकरण उच्च न्यायालयात गेल्यानंतर न्यायालयाने तिसऱ्या वेळी २० लाख रुपये स्थायी पोटगी मंजूर करून पतीच्या बाजूने घटस्फोटाच्या कौटुंबिक न्यायालयाच्या आदेशाला मंजुरी दिली. स्थानिक न्यायालयाने महिलेला २५ लाख रुपये पोटगी देण्याचा निर्णय तत्पूर्वी दिला होता. महिलेने तीन दशके विनापोटगी काढले याकडे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती उज्ज्वल भुयान यांचे लक्ष वेधले गेले. वारंवार घटस्फोट मंजुरीचा आदेश देणाऱ्या कौटुंबिक न्यायालयाच्या धोरणाबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. 

न्यायालयाचा दिलासा सर्वोच्च न्यायालयाने पती-पत्नी वेगळे राहत आहेत, हे लक्षात घेऊन कौटुंबिक न्यायालयाने दिलेला सशर्त आदेश कायम ठेवला. सर्वोच्च न्यायालयाने २० लाख रुपयांच्या पोटगीत  आणखी १० लाख वाढवण्याचे आदेशही दिले.  याशिवाय सध्या महिला, तिचा मुलगा आणि सासू ज्या घरात राहतात, तेही त्यांच्याकडेच राहील, मुलाला वारसाहक्काने मिळणाऱ्या स्थावर संपत्तीतही अधिकार असेल, असा दिलासा न्यायालयाने दिला.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयDivorceघटस्फोटrelationshipरिलेशनशिप