शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

‘भरपूर मुलं जन्माला घाला, घर मोदी देतील’, दोन पत्नी, आठ मुले असलेल्या मंत्र्याचं विधान व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2024 14:50 IST

Rajasthan News: राजस्थानमध्ये भाजपाची सत्ता आल्यानंतर भजनलाल शर्मा यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झाले आहे. मात्र सरकारची स्थापना होऊन महिनाही उलटत नाही तोच येथील आमदार आणि मंत्र्यांनी वादग्रस्त विधानं करून नवनव्या वादांना तोंड फोडण्यास सुरुवात केली आहे.

राजस्थानमध्येभाजपाची सत्ता आल्यानंतर भजनलाल शर्मा यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झाले आहे. मात्र सरकारची स्थापना होऊन महिनाही उलटत नाही तोच येथील आमदार आणि मंत्र्यांनी वादग्रस्त विधानं करून नवनव्या वादांना तोंड फोडण्यास सुरुवात केली आहे. आचार्य बालमुकुंद यांच्या विधानानंतर आता मंत्री बाबूलाल खराडी यांचं एक विधान चर्चेत आहेत. खराडी यांनी त्यांच्या मतदारसंघामध्ये बोलताना  लोकांना अधिकाधिक मुले जन्माला घालण्याचा सल्ला दिला. मात्र त्यांनी हे विधान गमतीचा भाग म्हणून केलं होतं. हेच विधान आता चर्चेत आहे.

आदिवासी विकास मंत्री खराडी यांनी जिल्ह्यातील नाई गावामध्ये विकसित भारत संपर्क यात्रेंतर्गत आयोजित एका कार्यक्रमामध्ये हे विधान केलं. ते म्हणाले की, तुम्ही भरपूर मुलांना जन्माला घाला. अडचण कुठली आहे? कुणी उपाशी आणि बेघर राहणार नाही, हे पंतप्रधान नरेंद्र मोदींचं स्वप्न आहे.

उल्लेखनीय बाब म्हणजे स्वत: खराडी यांच्या दोन पत्नी आणि आठ मुले आहेत. त्यात चार मुलगे आणि चार मुलींचा समावेश आहे. या भागात बहुविवाह प्रथा अजूनही सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी तुम्हाला घर बांधून देतील, असं विधान त्यांनी करताच उपस्थितांनी खो खो हसायला सुरुवात केली. खराडी यांनी हे विधान केलं तेव्हा मुख्यमंत्री भजनलाल शर्मा हेही मंचावर उपस्थित होते. झाडोल विधानसभा मतदारसंघातून चौथ्यांदा आमदार झालेले आणि पहिल्यांदाच मंत्री बनलेल्या बाबूलाल खराडी यांच्या विधानाची आता राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे.   

टॅग्स :Rajasthanराजस्थानNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपा