शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

एकाच दिवसात हनिमून संपला, घरी पोहोचताच नवरीने नवऱ्याविरोधात दिली तक्रार, धक्कादायक कारण आलं समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2023 17:20 IST

Crime News: ज्या हनिमूनच्यावेळी नवऱ्याने त्याच्या नवरीसोबत असायला हवं होतं. त्याच हनिमूनवेळी नवरा नवरीऐवजी गर्लफ्रेंडला व्हिडीओ कॉल करून तिच्यासोबत गुलुगुलू बोलत होता. ही बाब जेव्हा त्या नवरीने पाहिली तेव्हा मोठ्या वादाला तोंड फुटले.

ज्या हनिमूनच्यावेळी नवऱ्याने त्याच्या नवरीसोबत असायला हवं होतं. त्याच हनिमूनवेळी नवरा नवरीऐवजी गर्लफ्रेंडला व्हिडीओ कॉल करून तिच्यासोबत गुलुगुलू बोलत होता. ही बाब जेव्हा त्या नवरीने पाहिली तेव्हा मोठ्या वादाला तोंड फुटले. हॉटेलमध्येच या नवऱ्याने नवरीची धुलाई केली. वाद एवढा वाढला की, हॉटेलमधील स्टाफने मध्ये पडून सदर तरुणीला वाचवले. त्यामुळे हनिमून तर पूर्ण झाला नाही, उलट दोघेही दुसऱ्याच दिवशी घरी परत आले.

ही घटना आग्र्यामधील एका उच्चभ्रू कुटुंबात घडली आहे. एप्रिल २०२२ मध्ये येथील एका तरुणीचा विवाह पंचतारांकित हॉटेलमध्ये थाटामाटात झाला होता.  १० दिवसांनंतर नवविवाहित दाम्पत्य हनिमूनसाठी सिमला इथे गेलं. दोघेही तिथे एका रिसॉर्टमध्ये थांबले. मधुचंद्राच्या रात्री जेव्हा नवऱ्याने त्याच्या नवरीसोबत असणं आवश्यक होतं. मात्र तो त्यावेळी त्याच्या गर्लफ्रेंडसोबत व्हिडीओ कॉल करून गप्पा मारत बसला होता. नवरीने हे पाहिलं, तेव्हा तिनं याला विरोध केला. त्यामुळे संतापलेल्या नवऱ्याने तिला मारहाण केली. दरम्यान, हॉटेलमधील स्टाफने मध्ये पडून त्या नवरीला वाचवलं.

दरम्यान, आता वधूने आरोप केला की, विवाहानंतर मधुचंद्रासाठी जेव्हा ते सिमला येथे गेले. तेव्हा वराने कॅनडामध्ये घर घेण्यासाटी ५० लाख रुपयांची मागणी केली. मात्र त्याला नकार दिल्यावर तो संतप्त झाला. नणंदेने तर लग्नात घातलेले दागिने काढून आपल्याकडे ठेवले. मी हे सर्व सहन करत होते. नवरा हा व्यसनी आहे. तसेच त्याने गर्लफ्रेंडसमोरच माझा अपमान केला. तर सासऱ्यांनी मला मनोरुग्ण ठरवले. एवढंच नाही तर नणंद मला झोपेच्या गोळ्या खाऊ घालायची. कुटुंबीयांनी समजवल्यावरही सासरच्या मंडळींच्या वागण्यात काही फरक पडला नाही.

त्यानंतर डिसेंबरमध्ये नवरा मला सोडून कॅनडाला गेला. तसेच तो व्हॉट्सअॅपवर जेव्हा काही बोलायचा तेव्हा असभ्यपणे बोलायचा. जानेवारी महिन्यात तो परत आला. तेव्हा त्याने पुन्हा छळ करण्यास सुरुवात केली. तसेच दुसरे लग्न करण्याची धमकीही देऊ  लागला. फेब्रुवारी महिन्यात मी माहेरी निघून आले, तेव्हा तो तिथेही आला. त्याने मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिली. या जाचातून सुटण्याचे सर्व मार्ग बंद झाल्यावर तिने पोलिसांत तक्रार दिली. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीFamilyपरिवार