शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
5
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
6
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
7
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
8
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
9
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
10
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
11
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
12
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
13
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
14
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
15
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
16
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
17
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग
18
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
19
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
20
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  

मुद्द्याची गोष्ट... कुणी तुमचा डेटा चोरला तर..?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2024 07:00 IST

मुद्द्याची गोष्ट : नवे युग डेटा अर्थात माहितीचे आहे. आपला डेटा अनेक ठिकाणी गाेळा हाेताे. हा डेटा लीक झाल्यास तुमची वैयक्तिक आणि आर्थिक सुरक्षा धोक्यात येऊ शकते. एका क्षणात तुमचे बॅंक खाते रिकामे हाेईल किंवा तुमची ओळखही चोरी हाेऊ शकते. त्यामुळे डेटा सुरक्षिततेला फार महत्त्व आले आहे.

डॉ. अपूर्वा जोशीफॉरेन्सिक अकाऊंटंट,स्वतंत्र संचालकभारतात इंटरनेटचा प्रसार गेल्या दशकात प्रचंड प्रमाणात वाढलाय. डिजिटलायझेशनमुळे डेटा म्हणजे भविष्यातले ‘तेल’ म्हटले जाऊ लागले. डेटा मौल्यवान होऊ लागला. पण, त्यामुळे वेगळेच प्रश्न निर्माण होऊ लागले. त्यापैकी एक डेटाची सुरक्षितता. डेटा म्हणजे माहितीचा संग्रह. ही माहिती कोणत्याही स्वरूपात असू शकते. उदाहरणार्थ, मजकूर, चित्रे, व्हीडिओ, ऑडिओ इत्यादी. डेटाला मराठीत विदा असे पण म्हटले जाते. आपण दररोज अनेक प्रकारची माहिती गोळा करतो, विश्लेषण करतो आणि त्यावर आधारित निर्णय घेतो. डेटाचे विश्लेषण करून आपण नवीन उत्पादने आणि सेवा विकसित करू शकतो, समस्यांचे निराकरण करू शकतो. हा डेटा लीक झाला तर? डेटा लीक हे एक गंभीर आव्हान बनले आहे. 

डेटा प्रायव्हसी म्हणजे काय? 

डेटा प्रायव्हसी म्हणजे आपल्या वैयक्तिक माहितीचे संरक्षण करणे. यामध्ये आपले नाव, पत्ता, जन्म तारीख, संपर्क, आर्थिक, वैद्यकीय इत्यादी माहितीचा समावेश होतो. या माहितीचा गैरवापर होऊन आपल्यासाठी कोणताही धोका निर्माण होऊ नये म्हणून डेटा प्रायव्हसी महत्त्वाची ठरते.

डेटा किती प्रकारचा? काही सामान्य प्रकारांचा डेटा :  वैयक्तिक डेटा : नाव, पत्ता, संपर्क माहिती, आर्थिक माहिती, वैद्यकीय इत्यादी माहिती. बिझनेस डेटा : विक्री डेटा, ग्राहक डेटा, उत्पादने आणि सेवांची माहिती.विज्ञान आणि तंत्रज्ञान डेटा : संशोधन, प्रयोग, उपकरणे आणि प्रणालींबद्दलची माहिती.सार्वजनिक डेटा : सरकारी माहिती, निवडणूक, सार्वजनिक, सामाजिक इत्यादी माहिती. 

डेटा लीक कसा हाेताे?

हॅकिंगहॅकर्स तुमच्या डिव्हाइस किंवा नेटवर्कमध्ये प्रवेश करून तुमची माहिती चोरण्याचा प्रयत्न करतात.

मालवेयरएक प्रकारचे सॉफ्टवेअर जे तुमच्या डिव्हाइसवर गुप्तपणे स्थापित होते आणि माहिती चोरी करते.

फिशिंगहा प्रकार म्हणजे खोट्या ई-मेल किंवा वेबसाइटवर क्लिक करायला लावून फसवतो. 

मानवी चूकमानवी चुकीमुळे तुमची गोपनीय माहिती चुकीच्या लोकांना मिळते. 

कसा सुरक्षित ठेवाल डेटा?nपासवर्ड ऑनलाइन  वापरा.nपासवर्डमध्ये अंक, अक्षरे आणि विशेष चिन्हे वापरा.  nपासवर्ड नियमित बदला.nटू फॅक्टर ऑथेंटिकेशन वापरा.nडिव्हाइसचे सुरक्षा सॉफ्टवेअर अपडेट ठेवा.nआपल्या डिव्हाइसवर अँटीव्हायरस सॉफ्टवेअर वापरा.nसार्वजनिक नेटवर्कवर महत्त्वाची माहिती शेअर करणे टाळा.nसोशल मीडियावर तुमच्या वैयक्तिक माहितीचे जास्त प्रदर्शन टाळा.

नुकसान किती?‘अपग्रॅड’ या संस्थेने २०२१मध्ये एक अहवाल दिला हाेता. त्यानुसार, डेटा उल्लंघनामुळे किंवा हॅकिंगमुळे जागतिक स्तरावर होणारे वार्षिक नुकसान ४ लाख कोटी डॉलर्सपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी