विमानाने उड्डाण केलं अन् सगळे प्रवासी घाबरले, इंडिगोच्या विमानाचं इमर्जन्सी लँडिंग! नेमकं झालं काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2025 13:00 IST2025-07-08T12:59:43+5:302025-07-08T13:00:14+5:30

Indigo : इंडिगोचे फ्लाइट क्रमांक '६इ ७२९५' दररोज सकाळी ६:३५ वाजता इंदूरहून निघते. आज सकाळी हे विमान ठरलेल्या वेळेवर उडाले. पण...

The plane took off and all the passengers were scared, IndiGo plane made an emergency landing! What really happened? | विमानाने उड्डाण केलं अन् सगळे प्रवासी घाबरले, इंडिगोच्या विमानाचं इमर्जन्सी लँडिंग! नेमकं झालं काय?

विमानाने उड्डाण केलं अन् सगळे प्रवासी घाबरले, इंडिगोच्या विमानाचं इमर्जन्सी लँडिंग! नेमकं झालं काय?

इंदूरहून रायपूरला जाणाऱ्या इंडिगो एअरलाइन्सच्या विमानात मंगळवारी सकाळी तांत्रिक बिघाड झाल्याने उड्डाणाच्या सुमारे अर्ध्या तासानंतर आपत्कालीन लँडिंग (Emergency Landing) करावी लागली. इंडिगोचे फ्लाइट क्रमांक '६इ ७२९५' दररोज सकाळी ६:३५ वाजता इंदूरहून निघते. आज सकाळी हे विमान ठरलेल्या वेळेवर उडाले, पण काही वेळातच तांत्रिक समस्या आल्याने पायलटला विमान परत खाली उतरवावे लागले.

प्रवाशांना जाणवला मोठा धक्का
प्रवाशांनी दिलेल्या माहितीनुसार, विमानाने सकाळी ६:३० वाजता इंदूर विमानतळावरून उड्डाण केले. उड्डाण केल्यानंतर सुमारे ३० मिनिटांनी अचानक एक मोठा धक्का जाणवला. यामुळे प्रवासी घाबरले. त्यानंतर काही मिनिटांतच पायलटनी घोषणा केली की, तांत्रिक कारणामुळे विमान इंदूर विमानतळावर परत उतरवले जात आहे. सकाळी ७:१५ वाजता विमान सुरक्षितपणे उतरवण्यात आले.

पायलटला 'फॉल्स अलार्म' मिळाला
इंदूर विमानतळाच्या टर्मिनल मॅनेजरने सांगितले की, उड्डाणादरम्यान पायलटला 'फॉल्स अलार्म' (False Alarm) म्हणजेच तांत्रिक बिघाडाचे संकेत मिळाले होते. सुरक्षेच्या दृष्टीने असे संकेत गंभीर मानले जातात. त्यामुळे खबरदारी म्हणून पायलटनी विमान मध्येच परत फिरवण्याचा निर्णय घेतला. सुरक्षित लँडिंगनंतर सर्व प्रवाशांना विमानातून सुखरूप उतरवण्यात आले.

प्रवाशांना दोन पर्याय
तांत्रिक तपासणी आणि सुरक्षिततेच्या कारणांमुळे इंडिगोने हे विमान रद्द केले आहे. एअरलाइन्सने प्रवाशांना दोन पर्याय दिले आहेत. एकतर, त्यांना तिकिटाचे पूर्ण पैसे परत घेता येतील किंवा पुढील उड्डाणासाठी त्यांची बुकिंग बदलता येईल.

Web Title: The plane took off and all the passengers were scared, IndiGo plane made an emergency landing! What really happened?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.