शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
8
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
9
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
10
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
11
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
12
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
13
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
14
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
15
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
16
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
17
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
18
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
19
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
20
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

Pegasus : पेगॅसस प्रकरण संसदेत विरोधक लावून धरणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2022 06:16 IST

Pegasus : संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होताच शस्रास्रे खरेदीत पेगॅसस हेरगिरी प्रकरण लावून धरण्याची योजना विरोधी पक्षांनी बनवली आहे. 

- शीलेश शर्मा नवी दिल्ली : संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होताच शस्रास्रे खरेदीत पेगॅसस हेरगिरी प्रकरण लावून धरण्याची योजना विरोधी पक्षांनी बनवली आहे. काँग्रेस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार विधी तज्ज्ञांचा मोठा गट स्थापन केला जात आहे. हा गट सर्वोच्च न्यायालयात वेगवेगळ्या याचिकांच्या माध्यमातून नव्या खुलाशावर सरकारकडे उत्तर मागेल. अमेरिकेच्या न्यूयॉर्क टाइम्समधील बातमीनंतर पेगॅससचा विषय सरकारला अडचणींचा ठरत चालला आहे. सरकारने सर्वोच्च न्यायालयात आधी दिलेल्या शपथपत्रात असे कोणतेही हेरगिरी उपकरण खरेदी केल्याचा इन्कार केलेला आहे. न्यायालयाची एक समिती सेवानिवृत्त न्यायाधीश रवीन्द्रन यांच्या देखरेखीत तपास करीत आहे. सरकारने न्यूयॉर्क टाइम्समधील बातमी निराधार असल्याचे म्हटले तरी विरोधी पक्ष त्याला सहमत नाहीत. काँग्रेसचा आरोप आहे की, मोदी सरकारने हेरगिरी करून देशद्रोह केला असून सर्वोच न्यायालयाला धोका दिला आणि संसदेची दिशाभूल केली आहे. 

न्यायमूर्ती रविंद्रन समितीने न्यूयॉर्क टाइम्सच्या पेगॅसस बातमीची दखल घ्यावी, एडिटर्स गिल्ड ऑफ इंडियाची पत्राद्वारे केली मागणीनवी दिल्ली : २०१७ साली झालेल्या संरक्षण कराराच्या वेळी भारताने इस्रायलकडून पेगॅसस स्पायवेअर खरेदी केले होते, असा दावा न्यूयॉर्क टाइम्सने केला होता. त्या बातमीची पेगॅससप्रकरणी चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने नेमलेल्या न्या. आर. व्ही. रविंद्रन समितीने दखल घ्यावी, अशी मागणी एडिटर्स गिल्ड ऑफ इंडियाने या समितीला एक पत्र पाठवून केली आहे. भारतात पेगॅससद्वारे राजकीय नेते, न्यायाधीश, पत्रकार, अन्य मान्यवर लोकांचे फोन टॅप करण्यात आले होते का, याची चौकशी ही समिती करत आहे. ए़डिटर्स गिल्ड ऑफ इंडियाने व्ही. रविंद्रन यांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे की, पेगॅससबाबत केंद्र सरकार करत असलेल्या दाव्यांपेक्षा वेगळा तपशिल मांडणारी बातमी न्यूयॉर्क टाइम्सने प्रसिद्ध केली आहे. त्या बातमीची दखल घेऊन चौकशी समितीने केंद्र सरकार, कॅग, वित्त, संरक्षण, इलेक्ट्रॉनिक्स व माहिती - तंत्रज्ञान खात्याच्या सचिवांना पेगॅससबाबतचे त्यांचे मत प्रतिज्ञापत्राद्वारे सादर करण्याचे आदेश द्यावेत.मोदी सरकारने देशद्रोह केला -राहुल गांधीपेगॅससप्रकरणी न्यूयॉर्क टाइम्सच्या बातमीमुळे देशातील राजकीय वातावरण तापले आहे. लष्करी कारणांसाठी असलेल्या पेेगॅसस स्पायवेअरचा राजकीय नेते व अन्य नागरिकांचे फोन टॅप करण्यासाठी वापर करून मोदी सरकारने देशद्रोह केला आहे, अशी टीका काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केली होती.

टॅग्स :Central Governmentकेंद्र सरकारBJPभाजपाcongressकाँग्रेस