शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

महिला डॉक्टरच्या प्रेमात पडला पेशंट, उपचारांसाठी रोज येऊ लागला रुग्णालयात, अखेर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2022 12:08 IST

One Side Love: रुग्णालयामध्ये उपचारांसाठी आलेला एक रुग्ण महिला डॉक्टरच्या प्रेमात पडला. या डॉक्टरला पाहण्यासाठी तो एक दिवस आड आजारी पडल्याचे नाटक करून रुग्णालयात येऊ लागला.

कामपूर - उत्तर प्रदेशमधील कानपूरमधून एकतर्फी प्रेमाचा एक विचित्र प्रकार समोर आला आहे. येथील हॅलेट रुग्णालयामध्ये उपचारांसाठी आलेला एक रुग्ण महिला डॉक्टरच्या प्रेमात पडला. या डॉक्टरला पाहण्यासाठी तो एक दिवस आड आजारी पडल्याचे नाटक करून रुग्णालयात येऊ लागला. ही डॉक्टर जिथे ड्युटीवर असेल तिथे तो पोहोचू लागला. दरम्यान, १५ दिवस हा क्रम चालू राहिल्यानंतर संबंधित महिला डॉक्टरला संशय आला. तिने याची तक्रार वरिष्ठांकडे केली. त्यानंतर हॅलेट रुग्णालयातील सुरक्षारक्षकांनी या रंगेल पेशंटला पकडले आणि त्याची जोरदार धुलाई केली. मग त्याला पोलिसांच्या हवाली केले. 

पकडल्यानंतर हा तरुण म्हणाला की मी तर रुग्णालयात औषध घेण्यासाठी गेलो होतो. आता पुन्हा तिकडे जाणार नाही. मिळालेल्या माहितीनुसार कानपूरच्या जाजमऊ येथील रहिवासी तौहिद हा पंधरा दिवसांपूर्वी आजारी पडला होता. तेव्हा तो हॅलेट रुग्णालयात उपचारांसाठी आला होता. त्यावेळी ओपीडीमध्ये मेडिकल कॉलेजमधील ज्युनियर डॉक्टर रुग्णांवर उपचार करत होती. तिने तौहिदवरही उपचार केले.

तिने तौहिदला काही औषधे लिहून दिली. मात्र या डॉक्टरला पाहून तौहिद विरघळला. तो तिच्या प्रेमात पडला. त्यानंतर दर एक दिवस आड करून तो उपचारांसाठी रुग्णालयात येऊ लागला. अनेकदा त्याने वेगवेगळ्या नावांने ओपीडीची पावती तयार करून घेतली. तसेच ही महिला डॉक्टर जेव्हा रुग्णालयात ड्युटीवर नसायची तेव्हा तो इतर डॉक्टरांना याबाबत विचारायचा.

दरम्यान, तौहिदचा इरादा समजल्याचवर ज्युनियर महिला डॉक्टरने याबाबत वरिष्ठ डॉक्टरांकडे तक्रार केली. शनिवारी तौहिद पुन्हा एकदा ओपीडीची पावती करून ओपीडीमध्ये पोहोचला तेव्हा स्टाफ सतर्क होता. त्याने ज्युनियर डॉक्टरबाबत विचारणा करताच स्टाफने त्याची धुलाई केली. तसेच त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीdoctorडॉक्टरhospitalहॉस्पिटलUttar Pradeshउत्तर प्रदेश