शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
3
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
4
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
5
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
6
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
7
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
8
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
9
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
10
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
11
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
12
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
13
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
14
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
15
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
16
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
17
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
18
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
19
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
20
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

गुप्त अजेंड्याने ‘इंडिया’ हतबल; सरकार ‘जोमा’त, विरोधक ‘कोमा’त

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2023 11:12 IST

केंद्र सरकारने बोलाविलेल्या विशेष अधिवेशनात काही तरी मोठे घडणार याची विरोधी पक्षांना जाणीव आहे.

- सुनील चावके नवी दिल्ली : संसदेच्या पाच दिवसांच्या विशेष अधिवेशनात केंद्र सरकार नेमक्या कोणत्या धक्कातंत्राचा अवलंब करणार याचा अंदाजच येत नसल्यामुळे २८ पक्षांच्या ‘इंडिया’ आघाडीला हतबल होऊन बचावात्मक पवित्रा घेणे भाग पडले आहे. काँग्रेसचे अध्यक्ष आणि राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांच्या निवासस्थानी मंगळवारी रात्री झालेल्या विरोधी पक्षांच्या संसदीय नेत्यांच्या बैठकीत त्यामुळे या अधिवेशनासाठी कोणतीच रणनीती निश्चित होऊ शकली नाही. 

केंद्र सरकारने बोलाविलेल्या विशेष अधिवेशनात काही तरी मोठे घडणार याची विरोधी पक्षांना जाणीव आहे; पण ते अकल्पित काय असेल याची स्पष्ट कल्पनाच येत नसल्यामुळे कसा प्रतिसाद द्यावा हे ठरवता येत नसल्याचे वैफल्य खरगे यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत दिसून आले. 

असे गोपनीय काय? खासदारांनी या अधिवेशनात कशासाठी यावे? तुमचा कोणता गोपनीय अजेंडा आहे? कार्यक्रम का लपवता आहात? संसदेच्या विशेष अधिवेशनात लग्न आहे, मौंज आहे, श्राद्ध आहे की वाढदिवस आहे, असे सवाल संजय राऊत यांनी केले. 

विरोधक सावधकोणताही प्रस्ताव किंवा विधेयक संसदेत मांडले गेल्यास विरोधी पक्षांनी सभात्याग, बहिष्कार किंवा निषेध करण्याऐवजी विचारपूर्वक भूमिका घेण्याचा सल्ला काँग्रेसने दिला आहे. सरकारच्याच अजेंड्याचे वर्चस्व राहणार असल्यामुळे विरोधी पक्षांना चर्चा करण्याची संधी मिळणार नाही.

टॅग्स :BJPभाजपाcongressकाँग्रेस