शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

सर्वांनाच मोफत प्रवास देणारी देशातील एकमेव रेल्वे, जाणून घ्या विशेष कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2023 14:20 IST

या रेल्वेतून प्रवाशांना मोफत प्रवास कसा दिला जातोय, असा प्रश्न सर्वांनाच साहजिकरित्या पडणे आवश्यक आहे. 

हिमाचल प्रदेश - भारतीय रेल्वे ही जगातील सर्वात मोठी रेल्वेसेवा आहे. देशभरात जाळं विणलेल्या या रेल्वेतून आपण तुलनेनं कमी खर्चात प्रवास करू शकतो. मात्र, रेल्वेची एक ट्रेन अशीही आहे जी प्रवाशांना मोफत सेवा देते. विशेष म्हणजे २५ गावांतील लोकांना गेल्या ७३ वर्षांपासून ही रेल्वे मोफत सेवा देत आहे. कारण, कायदेशीररित्याही या रेल्वेतून विनातिकीट प्रवास करणे हा गुन्हा नाही. म्हणूनच, सर्वच प्रवाशी या रेल्वेतून मोफत प्रवासाचा आनंद घेतात. 

हिमाचल प्रदेश आणि पंजाबच्या सीमारेषेवर ही रेल्वे धावते. ज्यामध्ये, प्रवास करण्यासाठी एकही रुपया लागत नाही. जर तुम्ही भाखडा-नागल धरण पाहायला जाल, तर या रेल्वेतून तुम्हाला मोफत प्रवासाचा आनंद घेता येईल. नागल ते भाखडा बांध मार्गावरुन ही ट्रेन धावते. एकीकडे रेल्वे विभागाकडून प्रवाशांच्या तिकीट दरात वाढ करण्यात येत आहे. मात्र, या रेल्वेतून प्रवाशांना मोफत प्रवास कसा दिला जातोय, असा प्रश्न सर्वांनाच साहजिकरित्या पडणे आवश्यक आहे. 

भाखडा डॅमची माहिती देण्याच्या उद्देशानेच ही रेल्वेसेवा सुरू करण्यात आली आहे. देशातील सर्वात मोठा भाखडा डॅम कसा बनला, त्याचा इतिहास काय, कुठल्या परिस्थितीशी सामना करत हे धरण उभारले हे नव्या पिढीला कळावे, यासाठी ही ट्रेन प्रवासी आणि पर्यटकांना भाखडा धरणावर मोफत घेऊन जाते. भाखडा ब्यास मॅनेजमेंट बोर्डद्वारे (BBMB) ही ट्रेन सुरू आहे. हा रेल्वेमार्ग बनवताना, मोठ्या डोंगरांना पोखरुन रेल्वेमार्ग बनवण्यात आला. ज्याद्वारे धरणासाठी लागणारी साधनसामुग्री  पोहोचवण्यात येत होती. 

भाखडा ते नागला या रेल्वेला सर्वप्रथम १९४७ साली सुरू करण्यात आलं. या ट्रेनद्वारे २५ गावांतून दररोज ३०० प्रवासी प्रवास करतात. या ट्रेनचा सर्वाधिक फायदा विद्यार्थ्यांनाच होतो. ही ट्रेन नंगल येथून धरणापर्यंत धावते. दिवसातून दोन फेऱ्याही होतात. या ट्रेनचं विशेष म्हणजे या गाडीचे संपूर्ण रेल्वे कोच लाकडापासून बनविण्यात आलेले आहेत.  

टॅग्स :railwayरेल्वेHimachal Pradeshहिमाचल प्रदेशpassengerप्रवासीDamधरण