क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटनासाठी आलेले आमदार फलंदाजीस उतरले, पण मैदानात नको ते घडले 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2023 10:46 AM2023-12-26T10:46:35+5:302023-12-26T10:47:47+5:30

BJD MLA Bhupinder Singh: बीजेडीचे आमदार भूपिंदर सिंह हे काल कालाहांडी जिल्ह्यातील बेलखंडी येथे एका क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन करण्यासाठी आले होते. उद्घाटनानंतर आमदार महोदय क्रिकेट खेळण्यासाठी उतरले. मात्र फलंदाजी करत असताना ते अचानक पिचवर पडले आणि जखमी झाले. 

The MLAs who came to inaugurate the cricket tournament came out to bat, but the unexpected happened on the field | क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटनासाठी आलेले आमदार फलंदाजीस उतरले, पण मैदानात नको ते घडले 

क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटनासाठी आलेले आमदार फलंदाजीस उतरले, पण मैदानात नको ते घडले 

ओदिशामध्ये क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटनादरम्यान एक धक्कादायक प्रकार घडला आहे. येथे बीजेडीचे आमदार भूपिंदर सिंह हे काल कालाहांडी जिल्ह्यातील बेलखंडी येथे एका क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन करण्यासाठी आले होते. उद्घाटनानंतर आमदार महोदय क्रिकेट खेळण्यासाठी उतरले. मात्र फलंदाजी करत असताना ते अचानक पिचवर पडले आणि जखमी झाले. 

याबाबत अधिक माहिती देताना अधिकाऱ्यांनी सांगितले की, सोमवारी आमदार भूपिंदर सिंह हे बेलखंडी येथे एका क्रिकेट स्पर्धेच्या कार्यक्रमाचं उद्घाटन करण्यासाठी पोहोचले होते. तिथे खेळत असताना ते जखमी झाले.

त्यांनी सांगितले की, नारला येथील आमदार क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटनानंतर फलंदाजीमध्ये हात आजमावत होते. या दरम्यान, ते खेळपट्टीवर पडले आणि त्यांच्या डोक्याला दुखापत झाली. ७२ वर्षीय भूपिंदर सिंह यांना जखमी अवस्थेत जवळील आरोग्य केंद्रात नेण्यात आले. आता त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.  

Web Title: The MLAs who came to inaugurate the cricket tournament came out to bat, but the unexpected happened on the field

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.