शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

वक्तव्याला मंत्रीच जबाबदार, सरकार नव्हे; बोलण्यावर अधिक मर्यादा अशक्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2023 06:53 IST

न्यायमूर्ती एस. ए. नझीर यांच्या अध्यक्षतेखालील पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाने सांगितले की, सार्वजनिक पदावरील व्यक्तीच्या भाषण व अभिव्यक्तीच्या अधिकारावर कोणतेही निर्बंध लादले जाऊ शकत नाहीत.

नवी दिल्ली : सामूहिक जबाबदारीच्या तत्त्वाचा वापर करूनही, एखाद्या मंत्र्याच्या विधानाचा अप्रत्यक्षपणे सरकारशी संबंध असू शकत नाही. सार्वजनिकपदावरील व्यक्तीच्या अभिव्यक्तिच्या स्वातंत्र्यावर कोणतेही अतिरिक्त बंधन घालता येणार नाही, असे सुप्रीम कोर्टाने मंगळवारी स्पष्ट केले. न्यायमूर्ती एस. ए. नझीर यांच्या अध्यक्षतेखालील पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाने सांगितले की, सार्वजनिक पदावरील व्यक्तीच्या भाषण व अभिव्यक्तीच्या अधिकारावर कोणतेही निर्बंध लादले जाऊ शकत नाहीत. या खंडपीठात न्यायमूर्ती बीआर गवई, न्यायमूर्ती एएस बोपण्णा, न्यायमूर्ती व्ही. रामसुब्रमण्यम यांचा समावेश होता. 

२०१६ मध्ये मंत्र्यांनी केले होते वादग्रस्त विधान -जुलै २०१६ मध्ये उत्तर प्रदेशातील  बुलंदशहरजवळ महामार्गावर एक अत्याचाराची घटना घडली होती. यात 

एका व्यक्तीच्या पत्नी आणि मुलीवर काही जणांकडून सामूहिक बलात्कार करण्यात आला होता. हे प्रकरण कालांतराने सुनावणीसाठी सुप्रीम कोर्टात पोहचले होते. nयाचिकाकर्त्यांनी हे प्रकरण दिल्लीला हस्तांतरित करण्यात यावे आणि आणि उत्तर प्रदेशचे तत्कालीन मंत्री आझम खान यांच्या वादग्रस्त विधानाबद्दल त्यांच्याविरोधात गुन्हा नोंदवण्याची विनंती केली होती. सार्वजनिक पदावरील व्यक्तीने अशी विधाने करावी का, यावरून मोठा गदारोळ उडाला होता.

न्यायमूर्ती नागरत्ना यांनी नोंदविले भिन्न मत न्यायमूर्ती बी. व्ही. नागरत्ना यांनी इतरांशी मतभिन्नता व्यक्त करताना कलम १९ व्यतिरिक्त, अभिव्यक्तिच्या स्वातंत्र्यावर कोणतेही बंधन असू शकत नाही, हे मान्य केले; एखाद्या मंत्र्याने बदनामीकारक विधान केले, तर त्याचा अप्रत्यक्षपणे सरकारशी संबंध जोडला जाऊ शकतो, असे निरीक्षण नोंदविले.  

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालय