प्रक्षेपकाचे होणार १००वे उड्डाण; श्रीहरिकोटा अंतराळ केंद्रात तयारी, दोन उपग्रह अंतराळात एकमेकांना जोडणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2025 06:46 IST2025-01-01T06:46:04+5:302025-01-01T06:46:58+5:30

भविष्यातील अंतराळ मोहिमांसाठी महत्वाचे असलेल्या स्पेस डॉकिंग तंत्रज्ञानाची चाचणी करण्यासाठी इस्रोने उपयोगात आणलेले दोन उपग्रह एकमेकांपासून विलग होऊन सोमवारी आपापल्या कक्षेत स्थिरावले असून, प्रारंभीचे टप्पे यशस्वीरीत्या पूर्ण झाले. 

The launcher will have its 100th flight; Preparations are underway at the Sriharikota Space Center, two satellites will be connected in space | प्रक्षेपकाचे होणार १००वे उड्डाण; श्रीहरिकोटा अंतराळ केंद्रात तयारी, दोन उपग्रह अंतराळात एकमेकांना जोडणार

प्रक्षेपकाचे होणार १००वे उड्डाण; श्रीहरिकोटा अंतराळ केंद्रात तयारी, दोन उपग्रह अंतराळात एकमेकांना जोडणार

श्रीहरिकोटा : जिओसिंक्रोनस लॉन्च व्हेइकल (जीएसएलव्ही) मोहिमेसंदर्भात आंध्र प्रदेशमधील श्रीहरिकोटा अंतराळ केंद्रातून जानेवारीमध्ये प्रक्षेपकाचे १००वे प्रक्षेपण होणार आहे. प्रक्षेपकाने आपल्या ९९व्या उड्डाणात दोन उपग्रहांचे स्पेस डॉकिंगसाठी अवकाशात प्रक्षेपण केले, अशी माहिती इस्रोचे अध्यक्ष एस. सोमनाथ यांनी दिली. 

भविष्यातील अंतराळ मोहिमांसाठी महत्वाचे असलेल्या स्पेस डॉकिंग तंत्रज्ञानाची चाचणी करण्यासाठी इस्रोने उपयोगात आणलेले दोन उपग्रह एकमेकांपासून विलग होऊन सोमवारी आपापल्या कक्षेत स्थिरावले असून, प्रारंभीचे टप्पे यशस्वीरीत्या पूर्ण झाले. 

दोन उपग्रहांना अंतराळात एकमेकांशी जोडण्याचे तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी इस्रोने सोमवारी चाचणीतून मोठी कामगिरी बजावली आहे. या उपग्रहांची स्पेस डॉकिंग प्रक्रिया येत्या काही दिवसांनंतर म्हणजे ७ जानेवारीला पार पडू शकते. स्पेस डॉकिंग एक्सपिरिमेंटसाठी (स्पाडेक्स) हे दोन उपग्रह जोडले जाणार आहेत.

प्रगत संशोधनासाठी स्पेस डॉकिंग आवश्यक
- इस्रोचे अध्यक्ष एस. सोमनाथ यांनी सांगितले की, अंतराळ क्षेत्रातील प्रगत संशोधनासाठी स्पाडेक्स मोहीम अतिशय आवश्यक आहे. मानवाला अंतराळात घेऊन जाणे, अवकाश स्थानक बांधणे अशा भारताच्या आगामी प्रकल्पात स्पेस डॉकिंग हे तंत्रज्ञान महत्त्वाचे ठरणार आहे.
- पीएसएलव्ही सी-६० या प्रक्षेपकाने दोन महत्त्वाच्या उपग्रहांसह आणखी काही उपग्रह नेले होते. ते भूपृष्ठापासून ४७५ किमी उंचीवर नियोजित कक्षेत स्थिरावले. 

स्पेस डॉकिंगबाबत भारत होणार आत्मनिर्भर
स्पेस डॉकिंग प्रयोगासाठी दोन उपग्रहांचे प्रक्षेपण करणे ही प्रक्रिया देखील भारताने प्रथमच पार पाडली आहे. त्यासाठी एसडीएक्स०१ (चेझर), एसडीएक्स०२ हे दोन उपग्रह तयार करण्यात आले.

त्यांचे वजन प्रत्येकी २२० किलोचे असून, ते अनंत टेक्नॉलॉजिज लिमिटेड या कंपनीने इस्रोसाठी बनविले. या उपग्रहांची चाचणी एटीएलच्या प्रयोगशाळेत पार पाडल्या जातात. यामुळे स्पेस डॉकिंगबाबत भारत आत्मनिर्भर होइल.

श्रीहरिकोटा स्पेसपोर्टवरून १०० वे प्रक्षेपण होण्यासाठी जानेवारीमध्ये नियोजित जिओसिंक्रोनस लॉन्च व्हेइकल मिशनसह महत्त्वपूर्ण टप्पा गाठण्यासाठी इस्रो तयारी करत आहे, असे एका उच्च अधिकाऱ्याने सांगितले.
 

Web Title: The launcher will have its 100th flight; Preparations are underway at the Sriharikota Space Center, two satellites will be connected in space

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :isroइस्रो