शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

The Kashmir Files: ... म्हणून 'द काश्मीर फाईल्स' चित्रपटावर बंदी घाला, खासदार अजमल यांची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2022 15:08 IST

The Kashmir Files: खासदार बदरुद्दीन अजमल हे आसामच्या धुबरी लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी आहेत.

नवी दिल्ली - दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांच्या द काश्मीर फाईल्स या चित्रपटावरुन आता चांगलंच राजकारण तापलं आहे. भाजप नेत्यांनी हा चित्रपट पाहण्यासाठी कार्यकर्त्यांना आवाहन केलंय. तर, दस्तुरखुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींनीच हा चित्रपट चांगला असून अशा चित्रपटातून सत्य बाहेर येत आहे, असे म्हणत या चित्रपटाचं कौतूक केलं. त्यानंतर, विरोधी पक्षातील नेत्यांनीही या चित्रपटावर कमेंट करण्यास सुरुवात केली. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी थेट मोदींवर हल्लाबोल केला. तर, आसाममधील एका खासदाराने या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी केली आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी या चित्रपटाची स्तुती केल्यानंतर आता शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी या मुद्द्यावरून केंद्रातील मोदी सरकार आणि भाजपवर निशाणा साधला आहे. पंतप्रधान मोदी द काश्मीर फाइल्स या चित्रपटाचे प्रचारक असून, भाजपवाले राजकीय अजेंडा रावबत असल्याचा दावा संजय राऊत यांनी केला आहे. "केंद्र सरकार व आसाम सरकारने द काश्मीर फाईल्स या चित्रपटावर बंदी घातली पाहिजे. कारण या सिनेमामुळे जातीय तणाव निर्माण होईल. सध्याच्या भारतातील परिस्थिती पूर्वीसारखी नाही. आसाममधील नेल्लीच्या घटनेसह काश्मीर बाहेर अनेक घटना घडल्या, परंतु त्यांच्यावर कधी चित्रपट आला नाही", असं खासदार बदरुद्दीन अजमल यांनी म्हटले. विशेष म्हणजे, मी काश्मिर फाईल्स सिनेमा पाहिला नाही, असेही त्यांनी सांगितलं. खासदार बदरुद्दीन अजमल हे आसामच्या धुबरी लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी आहेत.

चित्रपटाला गर्दी, टीका अन् कौतूकही 

विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित ‘द काश्मीर फाइल्स’ हा चित्रपट (The Kashmir Files) चांगलाच चर्चेचा विषय बनला आहे. काश्मिरी पंडितांवर झालेले अत्याचार या चित्रपटात दाखवण्यात आले आहेत. मोठ्या संख्येने प्रेक्षक चित्रपटगृहात हजेरी लावत आहेत. अनेक बड्या चित्रपटांना टक्कर देत हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर कोट्यवधींचा गल्ला जमवत आहे. त्यातच भाजपच्या संसदीय बोर्डाच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या चित्रपटावर भाष्य केले. यानंतर यावरून पुन्हा एकदा राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडण्यास सुरुवात झाली आहे. संजय राऊत यांनी दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलताना हल्लाबोल केला आहे. 

काय म्हणाले होते पंतप्रधान मोदी?

द काश्मीर फाइल्ससारखे चित्रपट बनायला हवेत. अशा चित्रपटांतून सत्य जनतेसमोर येत असते. गेल्या अनेक दशकांपासून जे सत्य लपवण्याचा प्रयत्न झाला त्याला समोर आणले जात आहे. त्यामुळे जे लोक सत्य लपवण्याचा प्रयत्न करतायेत ते आज विरोध करत आहेत, असा टोला त्यांनी काँग्रेसला नाव न घेता लगावला. 

टॅग्स :AssamआसामJammu Kashmirजम्मू-काश्मीरNarendra Modiनरेंद्र मोदीMember of parliamentखासदार