शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
3
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
4
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
5
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
6
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
7
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
8
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
9
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
10
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
11
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
12
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
13
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
14
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
15
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
16
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
17
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थयथयाट
18
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
19
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
20
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!

The Kashmir Files Film: ... त्यावेळी जम्मू-काश्मीरमध्ये फारुक अब्दुल्ला नाही, तर राज्यपालांचं शासन होतं; ओमर अब्दुल्लांची प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2022 08:39 IST

The Kashmir Files Film: काश्मीर फाईल्स चित्रपटावर ओमर अब्दुल्ला यांनी दिली प्रतिक्रिया. चित्रपटात अनेक खोट्या गोष्टी दाखवल्याचा केला आरोप.

विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) दिग्दर्शित ‘द काश्मीर फाइल्स’ हा चित्रपट (The Kashmir Files) चांगलाच चर्चेचा विषय बनला आहे. काश्मिरी पंडितांवर झालेले अत्याचार या चित्रपटात दाखवण्यात आले आहेत. मोठ्या संख्येने प्रेक्षक चित्रपटगृहात हजेरी लावत आहेत. अनेक बड्या चित्रपटांना टक्कर देत हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर १०० कोटींच्या क्लबमध्ये पोहोचला आहे. असं असलं तरी या चित्रपटावरून दोन मतप्रवाह असल्याचं दिसून आलं आहे. दरम्यान, आता जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला (Omar Abdulla) यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. या चित्रपटात अनेक खोट्या गोष्टी दाखवण्यात आल्याचं त्यांनी म्हटलंय.

"द काश्मीर फाईल्स या चित्रपटात अनेक प्रकारच्या खोट्या गोष्टी दाखवण्यात आल्या आहेत. जेव्हा काश्मिरी पंडीत या ठिकाणाहून गेले तेव्हा फारुक अब्दुल्ला जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री नव्हते. त्यावेळ या ठिकाणी राज्यपालांचं शासन होतं आणि देशात भाजपचं समर्थन असलेल्या व्ही.पी. सिंह यांचं सरकार होतं," असं ओमर अब्दुल्ला म्हणाले. दक्षिण काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यात आयोजित एका रॅलीदरम्यान त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी यावर भाष्य केलं. "हा एक चित्रपट आहे ती डॉक्युमेंट्री हे स्पष्ट नाही. ज्यांना पलायन करावं लागलं आणि मृत्यू झाला त्यात काश्मिरी पंडीत एकटे नव्हते. त्यात मुस्लीम आणि शीख लोकांचाही मृत्यू झाला. त्यांनाही काश्मीरमधून पलायन करावं लागलं होतं आणि ते आतापर्यंत परतू शकले नाही," असंही ते म्हणाले. "नॅशनल कॉन्फरन्सनं काश्मिरी पंडीतांना परत आणण्यासाठी पूर्णपणे प्रयत्न केले आणि सुरू आहेत. जर असे चित्रपट बनवले गेले तर हे लोक परत येणार नाहीत याची खात्रीच निर्माते करत आहेत असं वाटतं. काश्मीर फाईल्स चित्रपटाच्या निर्मात्यांना काश्मिरी पंडितांचे पुनरागमन नको असल्याचं दिसतंय," असंही अब्दुल्ला म्हणाले.

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरThe Kashmir Filesद काश्मीर फाइल्सOmar Abdullahउमर अब्दुल्ला