शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

पंजाब में तो इस बार झाडू चल रहा है भाई...; भ्रष्टाचारमुक्त कारभाराची भुरळ, एकदा ‘आप’ला संधी देण्याची भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2022 08:00 IST

केजरीवाल यांच्या पराभव करण्यासाठी शेवटच्या टप्प्यात भाजपने आपले मतदान काँग्रेसकडे वळविल्याचेही येथे सांगण्यात आले. भाजपला, काँग्रेसपेक्षा केजरीवाल यांची भीती जास्त वाटते कारण ते सरकार चांगले चालवून दाखवितात अशीही चर्चा लोकांत आहे.

विश्वास पाटील -चंदीगड : विधानसभेच्या या निवडणुकीत पंजाबच्या जनतेचा मूड बदलला असल्याचे चित्र सर्वत्र दिसत आहे. सामान्य रिक्षाचालकांपासून ते सुशिक्षित, उच्च मध्यमवर्गीय सर्व लोकांच्या बोलण्यात एकच वाक्य शुक्रवारपासून ऐकत आहे, भाईसाब, पंजाब तो इसबार झाडू की हवा है..आतापर्यंत शिरोमणी अकाली दलास संधी दिली, काँग्रेसलाही संधी देऊन पाहिली आता एकदा आपला संधी देऊ अशी मानसिकता पंजाबी लोकांतून दिसून येत आहे. ही हवा अशीच राहिली तर पंजाबमध्ये सत्तांतर होण्याची शक्यता ठळक दिसत आहे.आपला लोकांची पसंती होण्याची दोन-तीन महत्त्वाची कारणे दिसतात. पंजाबची सीमा दिल्लीपर्यंत भिडली आहे. दिल्लीमध्ये गेल्या पाच वर्षात मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ज्या पद्धतीने भ्रष्टाचारमुक्त सरकार चालवून दाखविले, त्याबद्दल पंजाबी जनतेतही प्रचंड क्रेझ आहे. केजरीवाल सरकारच्या अन्य कोणत्याही वायद्यापेक्षा लोकांना भ्रष्टाचारमुक्त सरकार ही केजरीवाल यांची प्रतिमा जास्त भावली आहे. त्यामुळेच सर्वच स्तरांतील लोक आपला संधी देण्याची भूमिका अगदी उघडपणे बोलून दाखवित आहे. त्यामध्ये लढत कुणाची होणार याबद्दलही ते बोलायला तयार नाहीत. थेट आपला निवडून देण्याची भाषाच ते करत आहे. 

दिल्ली पॅटर्नची भीती...केजरीवाल यांच्या पराभव करण्यासाठी शेवटच्या टप्प्यात भाजपने आपले मतदान काँग्रेसकडे वळविल्याचेही येथे सांगण्यात आले. भाजपला, काँग्रेसपेक्षा केजरीवाल यांची भीती जास्त वाटते कारण ते सरकार चांगले चालवून दाखवितात अशीही चर्चा लोकांत आहे. 

गतनिवडणुकीत जोरदार लढतगेल्या विधानसभा निवडणुकीत आपने ११२ जागा लढवल्या होत्या. त्यांच्या उमेदवारांना ३६ लाख ६२ हजार मते मिळाली. एकूण मतांतील ही २३.७ टक्के मते आहेत. पहिल्यांदाच लढत देऊन आपने २० जागा जिंकल्या होत्या. आपचे २१ उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर होते. पंजाबच्या ११७ सदस्यांच्या विधानसभेत ५९ हा बहुमताचा आकडा आहे. गतनिवडणुकीतील एक व दोन नंबरवर असलेल्या उमेदवारांचा विचार करता त्या जागा जिंकून आपला आणखी १८ आमदार निवडून आणावे लागतील. 

टॅग्स :Punjab Assembly Election 2022पंजाब विधानसभा निवडणूक २०२२PunjabपंजाबArvind Kejriwalअरविंद केजरीवालcongressकाँग्रेसBJPभाजपा