शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
3
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
4
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
5
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
6
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
7
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
8
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
9
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
10
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
11
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
12
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
13
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
14
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
15
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
16
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
17
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
18
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
19
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
20
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी

दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2024 09:33 IST

दिल्लीत ते मैत्री दाखवत आहेत, पण पंजाबमध्ये दोघांमध्ये कुस्ती होत आहे, असा टाेला माेदी यांनी लगावला.

नवी दिल्ली : आपल्या दिल्लीतील पहिल्याच निवडणूक प्रचारसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिल्लीचे मुख्यमंत्री व आम आदमी पार्टीचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांचे नाव न घेता, त्यांच्यावर जोरदार हल्ला चढवत त्यांना महाभ्रष्टाचारी संबोधले. तसेच काँग्रेसवर टीका करताना पंतप्रधान म्हणाले की, राजधानीत काँग्रेस पक्षाला चार जागाही लढवता आल्या नाहीत. दिल्लीतील इंडी आघाडीने महाभ्रष्टाचाऱ्यांशी गळाभेट घेतली आहे. दिल्लीत ते मैत्री दाखवत आहेत, पण पंजाबमध्ये दोघांमध्ये कुस्ती होत आहे, असा टाेला माेदी यांनी लगावला.

पंतप्रधान म्हणाले की, "त्यांना धर्माच्या आधारावर आरक्षण द्यायचे आहे. त्यांना एससी, एसटी, ओबीसी यांचे हक्क हिसकावून, मुस्लिमांना द्यायचे आहेत. त्यांना कलम ३७० पुन्हा लागू करायचं आहे. अयोध्या राम मंदिराबाबत सर्वोच्च न्यायालयाचा निर्णयही रद्द करायचा आहे. काँग्रेसचे सरकार रिमोटने चालवले जात होते, दिल्लीतील हजारो मोक्यावरच्या सरकारी मालमत्ता काँग्रेसच्या काळात वक्फला देण्यात आल्या. काँग्रेसला सर्वसामान्यांची संपत्ती हिसकावून घ्यायची आहे. 

लोकसोचे ‘कुरुक्षेत्र’, विकास विरुद्ध व्होट जिहाद! लोकसभा निवडणूक हे ‘कुरुक्षेत्र’ असून त्यात भाजपचा विकास आणि विरोधकांचा ‘व्होट जिहाद’ यांच्यात खरी लढत असून, यापैकी एकाची निवड मतदारांना करायची आहे, असे प्रतिपादन मोदी यांनी हरियाणातील गोहाना येथील जाहीर सभेत केले. त्यांनी सांगितले की, विरोधकांना कोणतीही किंमत मोजून सत्ता हवी आहे आणि ही किंमत आहे देशाची सुरक्षा व स्थिरता यांचा बळी.  आपल्या धाकड सरकारने घटनेतील ३७० कलमाची भिंत पाडून टाकली, त्यामुळे आता काश्मीर विकासाच्या मार्गावर घोडदौड करीत आहे.

युपी आता तोफगोळ्यांच्या निर्मितीसाठी प्रसिद्ध : शाह -गावठी पिस्तुले बनविण्यासाठी कुप्रसिद्ध असलेला उत्तर प्रदेश आता लष्करास तोफगोळे बनविण्यासाठी प्रसिद्ध झाला आहे. भाजपचे सरकार सत्तेत आल्यानंतर या राज्यात इतका मोठा बदल झाला, असा दावा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी झाशी येथील भाजपच्या उमेदवार अनुराग शर्मा यांच्यासाठी आयाेजित प्रचारसभेत केला. त्यापूर्वी प्रचाराच्या शेवटच्या दिवशी शनिवारी अमित शाह यांनी अमेठीत ‘रोड शो’ करून भाजपच्या उमेदवार स्मृती इराणी यांच्यासाठी मते मागितली. 

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Narendra Modiनरेंद्र मोदीcongressकाँग्रेसAAPआप