वन नेशन-वन इलेक्शनबाबत झाली जेपीसीची पहिला बैठक, या मुद्यावर सर्व पक्षांचं झालं एकमत  

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2025 18:05 IST2025-01-08T18:03:29+5:302025-01-08T18:05:46+5:30

One Nation-One Election: देशातील लोकसभा आणि सर्व राज्यांमधील विधावसभा निवडणुका एकत्र घेण्याची तरतूद असलेल्या दोन विधेयकांवर विचारविनिमय करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या जेपीसी अर्थात संयुक्त संसदीय समितीची पहिली बैठक बुधवारी झाली

The first meeting of the JPC was held on One Nation-One Election, all parties reached a consensus on this issue. | वन नेशन-वन इलेक्शनबाबत झाली जेपीसीची पहिला बैठक, या मुद्यावर सर्व पक्षांचं झालं एकमत  

वन नेशन-वन इलेक्शनबाबत झाली जेपीसीची पहिला बैठक, या मुद्यावर सर्व पक्षांचं झालं एकमत  

देशातील लोकसभा आणि सर्व राज्यांमधील विधावसभा निवडणुका एकत्र घेण्याची तरतूद असलेल्या दोन विधेयकांवर विचारविनिमय करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या जेपीसी अर्थात संयुक्त संसदीय समितीची पहिली बैठक बुधवारी झाली. भाजपाचे खासदार पी.पी. चौधरी यांच्या अध्यक्षतेखालील या समितीच्या पहिल्या बैठकीमध्ये कायदे मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी जेपीसीच्या सदस्यांना दोन्ही प्रस्तावित कायद्यामधील तरतुदींची माहिती दिली. या बैठकीला काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी ह्याही उपस्थित होत्या.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार वन नेशन-वन इलेक्शन च्या पहिल्या बैठकीमध्ये समितीचा कार्यकाळ वाढवण्याच्या विषयावर सर्व सदस्यांमध्ये एकमत झालं. त्याबाबतचा प्रस्ताव हा पुढच्या अधिवेशनात दिला जाईल. या समितीला अर्थसंकल्पीय अधिवेसनाच्या शेवटच्या आठवड्यातील पहिल्या दिवसापर्यंत आपला अहवाल सादर करण्यास सांगण्यात आलं आहे. दरम्यान, वन नेशन वन इलेक्शनबाबतचं विधेयक १७ डिसेंबर रोजी लोकसभेत सादर करण्यात आलं आलं होतं.

या विधेयकाला विरोधी पक्षांकडून तीव्र विरोध झाल्यानंतर सरकारने वन नेशन वन इलेक्शनबाबत अभ्यास करण्यासाठी ३९ सदस्यांच्या संयुक्त संसदीय समितीची स्थापना केली आहे. या समितीमध्ये भाजपाचे १६, काँग्रेसचे ५, समाजवादी पार्टी, तृणमूल काँग्रेस आणि द्रमुकचे प्रत्येकी २, शिवसेना, टीडीपी, जेडीयू, आरएलडी, एलजेपी (रामविलास), जनसेना पार्टी, शिवसेना (उबाठा), एनसीपी (एसपी), माकप, आप, बीजू जनता दल आणि वायएसआर काँग्रेस यांच्या प्रत्येकी एका सदस्याचा समावेस आहे. 

Web Title: The first meeting of the JPC was held on One Nation-One Election, all parties reached a consensus on this issue.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.