शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

मोठा गाजावाजा करून घोषणा केलेली ‘इंडिया’ची पहिली संयुक्त जाहीर सभा रद्द, कारण..

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2023 08:48 IST

‘इंडिया’ आघाडीतर्फे देशव्यापी संयुक्त जाहीर सभांचा धडाका लावला जाईल आणि त्याची सुरुवात ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात भोपाळपासून होईल, अशी घोषणा दिल्लीत १३ सप्टेंबर रोजी झालेल्या ‘इंडिया’च्या समन्वय समितीने केली होती.

 नवी दिल्ली : ‘इंडिया’ आघाडी समन्वय समितीच्या पहिल्या बैठकीत मोठा गाजावाजा करून घोषणा केलेली भोपाळमधील पहिली संयुक्त जाहीर सभा रद्द करण्यात आली आहे. राज्यात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीपूर्वी काढण्यात येणाऱ्या काँग्रेसच्या ११ हजार ४०० किमी अंतराच्या राज्यव्यापी जनआक्रोश यात्रेमुळे ही रॅली रद्द करण्यात आल्याचे कारण देण्यात येत आहे. प्रत्यक्षात सनातन धर्मावर टीका करणाऱ्या ‘इंडिया’ आघाडीतील नेत्यांना भोपाळचे व्यासपीठ लाभू नये म्हणून राज्यातील काँग्रेसच्या नेत्यांनी ही रॅली रद्द करण्यास भाग पाडल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

‘इंडिया’ आघाडीतर्फे देशव्यापी संयुक्त जाहीर सभांचा धडाका लावला जाईल आणि त्याची सुरुवात ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात भोपाळपासून होईल, अशी घोषणा दिल्लीत १३ सप्टेंबर रोजी झालेल्या ‘इंडिया’च्या समन्वय समितीने केली होती. द्रमुक नेते उदयनिधी स्टॅलिन यांनी सनातन धर्मावर केलेल्या वादग्रस्त टिप्पणीचे तीव्र पडसाद हिंदी भाषिक राज्यांमध्ये उमटत आहेत. सनातनच्या मुद्यावर वाद-चर्चा बंद करावी, असे समन्वय समितीच्या बैठकीत सप, राजद आणि जदयुच्या नेत्यांनीही द्रमुकला बजावले होते.

मध्य प्रदेशात तयारीला फटका बसू नये, म्हणून...या मुद्यावरून मध्य प्रदेशात काँग्रेसच्या तयारीला फटका बसू नये म्हणून पहिली संयुक्त जाहीर सभाच रद्द करण्यास राज्यातील ज्येष्ठ नेत्यांनी काँग्रेस श्रेष्ठी तसेच ‘इंडिया’ आघाडीच्या समन्वय समितीला भाग पाडले आहे. मध्य प्रदेशात काँग्रेसचे गोविंद सिंह, जितू पटवारी, अरुण यादव, कमलेश्वर पटेल, अजय सिंह आणि कांतीलाल भुरिया हे सात नेते ११ हजार ४०० किलोमीटरच्या ‘जनआक्रोश यात्रे’मध्ये गुंतणार असल्यामुळे भोपाळच्या जाहीर सभेची तयारी करणे शक्य होणार नसल्याची सबब राज्यातील नेत्यांनी काँग्रेस श्रेष्ठींना दिली आहे.

टॅग्स :INDIA Opposition Allianceइंडिया आघाडीcongressकाँग्रेस