शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वेटर, कानटोपी, हातमोजे अन् ब्लँकेट...! तयार रहा, ८६ टक्के हिमालयाला बर्फाने आच्छादले
2
मंत्रिमंडळ मोठे निर्णय! बांबू उद्योग धोरण जाहीर, ५ लाख रोजगार; मुंबई HC मध्ये २२२८ पदांना मान्यता
3
"अशी निवडणूक पद्धत भारतात कुठेच नाही, मग फक्त महाराष्ट्रातच का लागू आहे?"; निवडणूक आयोगाला घेरले, 'मविआ'च्या पत्रात काय?
4
१९९० मध्ये १ किलो सोन्याची किंमत मारुती ८०० एवढी होती, आज लँड रोव्हरएवढी झालीय, २०४० मध्ये...; उद्योगपतीने हिशेबच मांडला
5
नाकेबंदीदरम्यान हवालाची रक्कम लुटली, बड्या महिला पोलिस अधिकाऱ्यासह ५ जण अटकेत   
6
“डोळ्यांत पाणी, उद्ध्वस्त घरे, थंड पडलेले सरकार अन् शेतकऱ्यांचे दिवाळे”: विजय वडेट्टीवार
7
गुजरात कॅबिनेटमध्ये मोठा फेरबदल; रवींद्र जडेजाच्या पत्नीला मंत्रिपदाची लॉटरी...
8
दिवाळीला घरी आणा नवी कोरी दुचाकी! देशातील सर्वात स्वस्त ५ बाईक्स, मायलेज-फीचर्स सर्वच दमदार
9
4G आले तरी... २० वर्षांचा प्रवास थांबला, ग्राहक बीएसएनलच्या सेवेला वैतागला, अखेर पोर्टिंगचा निर्णय घेतला...
10
माओवादी चळवळीला मोठा हादरा ! नक्षल्यांचा नेता ‘भूपती’सह ६० जणांनी पोलिसांसमोर केले आत्मसमर्पण
11
इंटरनेटशिवाय करता येणार पेमेंट; RBI ने लॉन्च केला ‘ऑफलाइन डिजिटल रुपया’, जाणून घ्या...
12
उद्धव ठाकरे अन् मविआ नेत्यांसोबत राज ठाकरे मंत्रालयात; मुख्य निवडणूक अधिकाऱ्याशी एकत्र चर्चा, 'इंजिना'ची ठरली दिशा?
13
एकनाथ शिंदेंनी सुरू केलेल्या योजना खरेच बंद होणार का? CM फडणवीसांनी सरळ सांगितले; म्हणाले...
14
सोन्याचे दर ₹१.३० लाखांच्या जवळ, चांदीचा भाव ₹१.८१ लाखांच्या पुढे, कॅरेटनुसार पाहा नवे दर
15
रोहित-विराट संदर्भातील 'त्या' प्रश्नावर गंभीर यांचं मोठं वक्तव्य; नेमकं काय म्हणाले कोच? जाणून घ्या सविस्तर
16
Tata Motors Demerger: टाटा मोटर्सच्या शेअर्समध्ये दिसली ४०% ची घसरण, काय आहे यामगची खरी कहाणी आणि पुढे काय होणार? जाणून घ्या
17
Viral: बंगळुरुमध्ये घरकाम करणाऱ्या बाईचा पगार ₹४५,०००; महिलेच्या दाव्याने सोशल मीडियावर खळबळ...
18
धक्कादायक! पतीशी वाद, रागातून आईकडूनच जुळ्या मुलांची हत्या, स्वत: चौथ्या मजल्यावरुन मारली उडी
19
तंत्र-मंत्र, जारण-मारण, गेंडे आणि म्हशी! आसाममध्ये गूढ जंगलात काळी जादू करणारं गाव

देशात मंकीपॉक्सचा पहिला रुग्ण आढळला, केंद्र सरकारनं अधिकृतपणे दिली माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2024 20:16 IST

संबंधित व्यक्तीचे नमुने तपासल्यानंतर संक्रमणाची पुष्टी करण्यात आली आहे. आरोग्यमंत्रालयाने एक निवेदन जारी करत चिंतेचे काहीही कारण नसल्याचे म्हटले आहे.

देशात मंकीपॉक्सचा पहिला रुग्ण आढळून आला आहे. यासंदर्भात स्वतः केंद्र सरकारने पुष्टी केली आहे. तसेच यासंदर्भात केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना एक अॅडव्हायजरीही जारी केला आहे. एमपॉक्स व्हायरसची लागण झालेल्या परदेशातून परतलेल्या एक व्यक्तीला रुग्णालयात अलग ठेवण्यात आले आहे. संबंधित व्यक्तीचे नमुने तपासल्यानंतर संक्रमणाची पुष्टी करण्यात आली आहे. आरोग्यमंत्रालयाने एक निवेदन जारी करत चिंतेचे काहीही कारण नसल्याचे म्हटले आहे.

पश्चिम आफ्रिकेतील क्लेड-2 एमपॉक्स व्हायरस आढळला -  केंद्राने दिलेल्या माहितीनुसार, एक पुरुष व्यक्ती नुकतीच मंकीपॉक्स संक्रमणाचा सामना करत असलेल्या देशातून परतली आहे. तिला एमपॉक्सची लागण झाल्याचे आढळून आले आहे. एएनआयच्या वृत्तानुसार, एमपॉक्सच्या पहिल्या रुग्णाची पुष्टी प्रवासाशी संबंधित संक्रमणाच्या स्वरुपात करण्यात आली आहे. लॅबने रुग्णाला पश्चिम आफ्रिकन क्लेड-2 च्या एमपॉक्स व्हायरसची लागण झाल्यची पुष्टी केल्याचे केंद्रीय आरोग्यमंत्रालयाने म्हटले आहे.

WHO च्या अहवालाचा भाग नाही - केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, हे एक वेगळे प्रकरण आहे. जे जुलै 2022 पासून भारतात रिपोर्ट करण्यात आलेल्या आधिच्या 30 प्रकरणांसारखे आहे. हे सध्याच्या सार्वजनिक आरोग्य आणीबाणीचा (WHO चा अहवाल) भाग नाही. जो Mpox च्या Clade 1 संदर्भात आहे.

एमपॉक्स संक्रमण असलेल्या देशातून आला रुग्ण - केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिल्लया माहितीनुसार, संबंधित व्यक्तीने MPOX संसर्ग असलेल्या देशातून आली आहे. रुग्णाला आयसोलेशनसाठी एका रुग्णालयात ठेवण्यात आले आहे. सध्या त्याची प्रकृती स्थिर आहे. एमपीओएक्सची पुष्टी करण्यासाठी रुग्णाच्या नमुन्याची चाचणी केली जात आहे. याशिवाय संबंधित रुग्णाला कसल्याही प्रकारचा आजार नाही.

टॅग्स :Central Governmentकेंद्र सरकारHealthआरोग्यhospitalहॉस्पिटल