शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
2
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
3
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
4
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
5
पतीनं पत्नीकडून घरखर्चाचा हिशोब मागणं क्रूरता?; सुप्रीम कोर्टाने सुनावला महत्त्वाचा निकाल
6
अयोध्या राम मंदिरात ७० नवे पुजारी घेतले जाणार, ट्रस्टचा निर्णय; परिसरातील मंदिरात सेवा करणार
7
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
8
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
9
Tarot Card: 'ऐकावे जनाचे, करावे मनाचे' याची प्रचिती देणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
10
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
11
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
12
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
13
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
14
अकोला महापालिका: भाजप-शिंदेंच्या शिवसेनेचं युतीबाबत निर्णय कधी? ठाकरेंची शिवसेना-मनसेची बोलणी सुरू
15
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
16
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
17
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
18
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
19
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
20
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
Daily Top 2Weekly Top 5

चालक मोबाईल पाहत राहिला अन् ट्रेन गेली प्लॅटफॉर्मवर; व्हिडिओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2023 06:31 IST

मथुरेतील अपघाताचा व्हिडीओ व्हायरल

लाेकमत न्यूज नेटवर्कमथुरा : उत्तर प्रदेशातील मथुरा येथे मंगळवारी रेल्वेचा भीषण अपघात झाला. या रेल्वे दुर्घटनेच्या संयुक्त तपास अहवालात चालक रेल्वे चालवताना मोबाईल फोनवर काहीतरी पाहत असल्याचे समोर आले आहे. तसेच तो सौम्य नशेच्या अवस्थेत होता, असेही तपास अहवालात नमूद केले आहे.    

चालकाच्या चुकीमुळे ट्रेन प्लॅटफॉर्मवर चढली होती असे सूत्रांनी सांगितले. ही चूक ‘क्रू व्हॉईस अँड व्हिडीओ रेकॉर्डिंग सिस्टिम’च्या माध्यमातून उघड झाली. रेल्वे स्थानकावर आल्यानंतर सर्व प्रवासी खाली उतरले, असे त्यात म्हटले आहे. यानंतर रेल्वे कर्मचारी सचिन त्याच्या मोबाईलवर काहीतरी पाहत असताना ट्रेनच्या इंजिनमध्ये पोहोचला. त्याने आपली बॅग इंजिनच्या एक्सलेटरवर ठेवली आणि त्याच्या मोबाईलमध्ये काहीतरी पाहू लागला. बॅगेच्या दाबामुळे एक्सलेटर पुढे सरकले आणि ट्रेन पुढे जाऊ लागली अन् हा अपघात झाला. 

दरम्यान, ट्रेनमध्ये बसलेले प्रवासी आधीच उतरले होते. मंगळवारी रात्री १०.५५ च्या सुमारास लोको पायलट इंजिन बंद करून ते पार्क करत असताना हा अपघात झाला.  प्लॅटफॉर्मवर रेल्वे इंजिनच्या प्रवेशापासून काही अंतरावर ओएचई लाईनचा पोल लावण्यात आला होता, त्यामुळे ट्रेनचे इंजिन त्यावर आदळले आणि थांबले. त्यामुळे अनर्थ टळल्याचे सांगण्यात आले. 

विचित्र अपघातमथुरा जंक्शनवर शकूरबस्ती-नवी दिल्ली-मथुरा शटल ईएमयू ट्रेन प्लॅटफॉर्म क्रमांक दोनवर रुळावरून घसरल्याने मोठा अपघात झाला. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. इंजिन प्लॅटफार्मवर येताच प्लॅटफार्मवरील प्रवासी पळून गेल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही. 

 

टॅग्स :mathura-pcमथुराrailwayरेल्वेAccidentअपघात