पाच जवानांचा जीव घेणाऱ्या दोघांचा खात्मा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2023 05:45 IST2023-11-24T05:44:38+5:302023-11-24T05:45:00+5:30

राजौरीत आणखी एक जवान शहीद

The death of the two who took the lives of five jawans | पाच जवानांचा जीव घेणाऱ्या दोघांचा खात्मा

पाच जवानांचा जीव घेणाऱ्या दोघांचा खात्मा

लोकमत न्यूज नेटवर्क
राजौरी : जम्मू-काश्मीरच्या राजौरीमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत गुरुवारी लष्कर-ए-तोयबाच्या कमांडरसह दोघांचा खात्मा करण्यात आला. बुधवारपासून सुरू असलेल्या चकमकीमध्ये सुरक्षादलाच्या दोन कॅप्टनसह दोन जवान शहीद झाले होते. आज पुन्हा झालेल्या चकमकीत आणखी एका जवानाचा मृत्यू झाल्याने एकूण ५ जण शहीद झाले.

बुधवारी चकमकीमध्ये दोन कॅप्टनसह दोन जवान शहीद, तर दोघे जखमी झाले होते. गुरुवारी पुन्हा चकमकीला सुरुवात झाल्यानंतर त्यात दोन्ही दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. त्यावेळी एका जवानाचा मृत्यू झाला, तर दोघे जखमी झाले.

शहीद झालेले जवान
nकॅप्टन एम. व्ही. प्रांजल,
nकॅप्टन शुभम यादव,
nहवालदार अब्दुल माजीद,
nलान्स नायक संजय बिष्ट
nपराट्रुपर सचिन लौर

Web Title: The death of the two who took the lives of five jawans