शहरं
Join us  
Trending Stories
1
शत्रूसाठी कोणतेच स्थान सुरक्षित नाही हे ‘ऑपरेशन सिंदूर’ने सिद्ध केले: पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
आजचे राशीभविष्य २८ जुलै २०२५ : प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल
3
राज ठाकरे 'मातोश्री'वर, पुन्हा मनोमिलनाची चर्चा; दोन्ही भावांची गळाभेट, वीस मिनिटे संवाद
4
वरळीतील  कार्यक्रमात अमित ठाकरे हजर; आदित्य ठाकरेंची पाठ, ज्युनियर ठाकरे एकत्र यायचा योग नाही
5
गोंधळानंतर संसदेत आजपासून पुन्हा चर्चा तापणार; ‘ऑपरेशन सिंदूर’वर सत्ताधारी-विरोधक आमने-सामने
6
महाराष्ट्रातील खासदारांना संसदरत्न; संसदीय कामकाज मंत्री किरीन रिजीजू यांच्या हस्ते पुरस्कार
7
पुण्यातील रेव्ह पार्टीवर कारवाई; एकनाथ खडसेंच्या जावयासह ७ अटकेत, दोन महिलांना रंगेहाथ पकडले
8
वीजप्रवाह उतरल्याच्या अफवेमुळे पळापळ; हरिद्वारच्या मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी
9
११व्या शतकातील शिवमंदिरावरून उफाळला थायलंड-कंबोडिया संघर्ष; नेमके प्रकरण काय, वाद का वाढला?
10
थायलंड-कंबोडिया अखेर शस्त्रसंधीसाठी तयार; ट्रम्प यांची मध्यस्थी, सीमेवर अद्यापही तणाव कायम
11
अमेरिकेत बोइंग विमानाला आग, १७३ प्रवासी बालंबाल बचावले; लँडिंग गीअर बिघडले, उड्डाण रोखले
12
“रोख व्यवहार हा कायदेशीर वसूलपात्र कर्ज नाही”; केरळ हायकोर्टाचे निरीक्षण, प्रकरण काय?
13
खड्ड्यावरील दंडाला गणेश मंडळांचा विरोध; लहान मूर्तींनाही परवानगी देण्याची बैठकीत मागणी
14
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
15
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
16
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
17
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
18
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
19
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
20
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी

देशाचा एक्स-रे व्हावा; मग कळेल देशात OBC-दलित अन् अल्पसंख्याक..; राहुल गांधींचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2025 18:22 IST

अहमदाबादमध्ये काँग्रेस अधिवेशनातून राहुल गांधींनी दलित, मागासवर्गीय, आदिवासी, आरएसएस, अदानी-अंबानीसह विविध मुद्द्यांवर भाष्य केले.

Rahul Gandhi AICC : गुजरातमधील अहमदाबाद येथे साबरमती नदीच्या काठावर काँग्रेसचे राष्ट्रीय अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनात पक्षाच्या प्रमुखांसह देशभरातील सर्व प्रमुख नेते उपस्थित आहेत. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना राहुल गांधींनी दलित, मागासवर्गीय, आदिवासी, अल्पसंख्याक, आरक्षण, आरएसएस, अदानी-अंबानी, बांग्लादेश आणि ट्रम्प टॅरिफ मुद्द्यावर भाष्य केले.

जातीय जनगणनेच्या मागणीचा पुनरुच्चारराहुल गांधी म्हणतात, 'आपण देशाचा एक्स-रे करुन पाहिला पाहिजे, जेणेकरुन देश खरोखरच दलित, गरीब, मागासलेल्यांचा आदर करतो का, हे समजेल. तेलंगणामध्ये आम्ही जात जनगणनेचे क्रांतिकारी पाऊल उचलले. आम्ही संसदेत जातीय जनगणनेची मागणी केली होती, पण मोदीजी आणि आरएसएसने स्पष्टपणे नकार दिला. मी फक्त जातीय जनगणनेची मागणी केली, ज्याद्वारे मला जाणून घ्यायचे होते की, या देशात देशात कोणाचा सहभाग किती आहे.' 

तेलंगणामध्ये 90% ओबीसी'तेलंगणातील 90% लोकसंख्या ओबीसी, अत्यंत मागासवर्गीय, दलित, अत्यंत दुर्लक्षित दलित, अल्पसंख्याक आणि आदिवासींची आहे. जर तुम्ही तेलंगणातील कॉर्पोरेट क्षेत्राकडे पाहिले, मालक, सीईओ आणि वरिष्ठ व्यवस्थापनाची यादी पाहिली, या 90 टक्के लोकसंख्येपैकी एकही व्यक्ती सापडणार नाही. तेलंगणाच्या कॉर्पोरेट क्षेत्रात या 90 टक्के क्षेत्राचा सहभाग जवळजवळ नाही. मला आनंद आहे की, जातीच्या जनगणनेनंतर तेलंगणातील आमच्या मुख्यमंत्र्यांनी ओबीसी आरक्षण 42 टक्क्यांपर्यंत वाढवले.'

राहुल पुढे म्हणतात, 'पंतप्रधान मोदी 24 तास मागासवर्गीयांबद्दल बोलतात. पण जेव्हा सहभागाचा प्रश्न येतो, तेव्हा भाजपचे लोक गप्प बसतात. आम्ही पुन्हा सत्तेत आल्यावर 50% आरक्षणाची भिंत तोडू, जात जनगणना करू.' राहुल गांधी यांनी अमेरिकन टॅरिफबाबतही केंद्र सरकारवर हल्लाबोल केला. ते म्हणाले, 'ट्रम्प यांनी नवीन शुल्क लादणार असल्याचे सांगितले होते. मोदी सरकारने यावर काहीही केले नाही. संसदेत हे नाट्य दोन दिवस चालले. देशावर गंभीर आर्थिक संकटे येणार आहेत पण नरेंद्र मोदी गप्प आहेत,' अशी टीकाही त्यांनी केली.

आम्ही ब्रिटिशांविरुद्ध अन् आरएसएसविरुद्ध लढलो...'आपण स्वातंत्र्यासाठी फक्त ब्रिटिशांशी लढलो नाही, तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाविरुद्धही लढलो. संघाची विचारसरणी ही स्वातंत्र्यलढ्याची विचारसरणी नाही. रामलीला मैदानात आरएसएसने हे संविधान जाळले होते. या संविधानात लिहिले आहे की आपला ध्वज तिरंगा असेल. आरएसएसने या तिरंग्यालाही सलाम केला नाही. हे लोक लोकशाही संपवू इच्छितात. हे सरकार सर्व पैसे अदानी-अंबानींना देऊ इच्छिते. मी एससी/एसटी उपयोजनेचा मुद्दा उपस्थित केला होता.

आम्ही एक क्रांतिकारी कायदा आणला होता, पण भाजपने हा कायदा रद्द केला. भाजप देशातील सर्व संस्थांवर एक-एक करून हल्ला करत आहे. जिथे जिथे दलित, मागासवर्गीय, आदिवासी, अल्पसंख्याक आणि गरीब सामान्य वर्गातील लोकांना स्थान मिळत होते, तिथे भाजपने सर्व ठिकाणांचे दरवाजे बंद केले आहेत,' अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.   

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसBJPभाजपाRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघ