शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

'भाजप देशाची पहिली पसंती; काँग्रेसच्या निगेटिव्ह राजकारणाला देशाने नाकारले', पीएम मोदींची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2026 14:01 IST

'ज्या मुंबईत काँग्रेसचा जन्म झाला, तिथे आज ते चौथ्या-पाचव्या क्रमांकावर पोहोचले आहेत'

PM Narendra Modi Slams Congress: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी आसाममधील काजीरंगा येथे झालेल्या भव्य जाहीर सभेतून काँग्रेसवर तीव्र शब्दांत टीका केली. 'काँग्रेसची निगेटिव्ह पॉलिटिक्स देश नाकारत आहे. ज्या मुंबईत काँग्रेसचा जन्म झाला, तिथे आज ते चौथ्या-पाचव्या क्रमांकावर पोहोचले आहेत', अशी टीका मोदींनी केली.  या दौऱ्यात त्यांनी 6,957 कोटी रुपयांच्या काजीरंगा एलिव्हेटेड कॉरिडोरचे भूमिपूजन, तसेच दोन अमृत भारत एक्सप्रेस गाड्यांना हिरवा झेंडा दाखवला.

घुसखोरीवरून काँग्रेसवर थेट आरोप

पंतप्रधान मोदी म्हणाले की, 'काँग्रेसच्या काळात आसाममध्ये घुसखोरी सातत्याने वाढली होती. काँग्रेसला आसामच्या इतिहास, संस्कृती आणि अस्मितेशी काहीही देणेघेणे नव्हते. त्यांनी आसामची माती घुसखोरांच्या हवाली केली होती. घुसखोरीमुळे लोकसंख्येचे संतुलन बिघडत असून, हे आसामसह देशाच्या सुरक्षेसाठी मोठे संकट आहे. घुसखोरांना वाचवा आणि त्यांच्याच मदतीने सत्ता मिळवा, हेच काँग्रेसचे धोरण आहे,' असे म्हणत त्यांनी बिहारमधील राजकारणाचाही उल्लेख केला.

भाजपा देशाची पहिली पसंती

पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले, 'भारतीय जनता पार्टी ही आज देशातील मतदारांची पहिली पसंती ठरत आहे. बिहारमध्ये 20 वर्षांनंतरही भाजपाला विक्रमी मते, मुंबई महापालिकेत पहिल्यांदाच भाजपाला मोठा जनादेश आणि केरळमधील तिरुवनंतपुरममध्ये भाजपाचा पहिला महापौर बसला आहे. देशाचा मतदार आज गुड गव्हर्नन्स, विकास आणि वारशाचे जतन करणाऱ्या राजकारणाला पसंती देतो,' असे मोदी म्हणाले.

काजीरंगा फक्त राष्ट्रीय उद्यान नाही, तर आसामची आत्मा

काजीरंगा संदर्भात बोलताना पंतप्रधान मोदी भावनिक झाले. 'काजीरंगा माझ्या आयुष्यातील खास अनुभवांपैकी एक आहे. इथे मी रात्रभर मुक्काम केला आणि सकाळी हत्ती सफारी करताना या परिसराचे सौंदर्य जवळून पाहिले आहे. काजीरंगा राष्ट्रीय उद्यान हे केवळ नॅशनल पार्क नाही, तर आसामची आत्मा आहे. युनेस्कोने याला जागतिक वारसा स्थळाचा दर्जा दिला आहे. पर्यटन वाढल्यामुळे होमस्टे, गाईड सेवा, हस्तकला, वाहतूक आणि स्थानिक व्यवसायांतून युवकांना रोजगाराच्या नव्या संधी मिळत आहेत' असेही त्यांनी नमूद केले.

English
हिंदी सारांश
Web Title : Country rejects Congress' negative politics: PM Modi on Maharashtra victory.

Web Summary : PM Modi criticized Congress for negative politics, citing their decline in Mumbai. He accused them of enabling Assam's infiltration, jeopardizing security. BJP's governance and heritage preservation are now preferred, he added, emphasizing Kaziranga's importance.
टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीcongressकाँग्रेसBJPभाजपाAssamआसामMumbai Municipal Corporationमुंबई महानगरपालिका